काँग्रेसच्या टीकेवर भडकल्या स्मृती इराणी, केला पलटवार

काँग्रेसच्या टीकेवर भडकल्या स्मृती इराणी, केला पलटवार

'काँग्रेसने जी शक्य आहे ती सर्व दुषणं काँग्रेसने आपल्याला लावली मात्र त्यांच्या सर्व आरोपांना मी पुरून उरेन.'

  • Share this:

नवी दिल्ली 12 एप्रिल : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी काँग्रेसवर आज चांगल्याच भडकल्या. इराणी यांच्या शैक्षणिक पात्रतेवर काँग्रेसने टीका केली होती. इराणी यांनी उमेदवारी अर्ज भरताना जे प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं त्यावरून काँग्रेसने त्यांच्यावर उपहासात्मक टीका केली होती. त्यावर स्मृती इराणी म्हणाल्या काँग्रेसने गेल्या पाच वर्षात त्यांचा अपमान केला. काँग्रेस जेवढा अपमान केरल त्यापेक्षा जास्त त्या अमेठीत काँग्रेसविरुद्ध काम करतील.

एक महिला असल्याने जे शक्य आहे ती सर्व दुषणं काँग्रेसने आपल्याला लावली मात्र त्यांच्या सर्व आरोपांना मी पुरून उरेन असा इशाराही त्यांनी दिला.

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या संपत्तीनंतर आता त्यांच्या पदवीवरूनही चर्चा सुरू झाली आहे. स्मृती इराणी यांनी अमेठीमधून उमेदवारी अर्ज भरला. त्यावेळी त्यांच्या संपत्तीमध्ये घट झाल्याचं सगळ्यांसमोर आलं. पण त्याचवेळी त्यांनी त्यांच्या डिग्रीबदद्ल वेगळीच माहिती दिल्याचंही उघड झालं आहे.

यावेळच्या उमेदवारी अर्जात त्यांनी आपण ग्रॅज्युएट नाही, असं म्हटलं आहे. त्यांना मध्येच कॉलेज सोडावं लागलं, असा उल्लेख त्यांनी केला आहे. हीच संधी काँग्रसने साधली आहे. याआधी स्मृती इराणी यांनी आपण ग्रॅज्युएट म्हणजेच पदवीधर असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळेच स्मृती इराणी खोटं बोलत आहेत, अशी टीका काँग्रेसने केली. स्मृती इराणी खोटं बोलत असल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

एक डिग्री आती है... जाती है

काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी स्मृती इराणी यांच्या सीरियलमधल्या 'क्योंकी सास भी कभी बहु थी' या गाण्याची नक्कल करत स्मृती इराणी यांची खिल्ली उडवली.

'क्विालिफिकेशन के भी रूप बदलते है, नए नए सांचे में ढलते है, एक डिग्री आती है, एक डिग्री जाती है, बनते अॅफिडेव्हिट नए हैं' अशा सुरात आणि शब्दात प्रियांका चतुर्वेदी यांनी गाऊन दाखवलं.

उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस प्रवक्ते अंशु अवस्थी यांनीही स्मृती इराणी यांच्यावर टीका केली. स्मृती इराणी या लोकांशी आणि निवडणूक आयोगाशी पुन्हापुन्हा खोटं बोलत आहेत, असं ते म्हणाले. त्यांच्या उमेदवारी अर्जात त्यांच्या डिग्रीचं सत्य समोर आलं आहे, याची आठवण त्यांनी करून दिली.

'शिक्षणमंत्र्यांकडेच डिग्री नाही'

भाजपने स्मृती इराणींसारख्या नेत्याला मनुष्यबळ विकास मंत्री बनवलं. देशातल्या शिक्षणाची सूत्रं ज्यांच्याकडे आहेत त्यांच्या शिक्षणाबद्दलच खोटीनाटी माहिती दिली जाते हे आक्षेपार्ह आहे. स्मृती इराणी यांच्याकडे पदवी नाही हेच समोर आलं आहे. मोदींच्या न्यू इंडिया चं व्हिजन हेच आहे का, असा सवालही त्यांनी विचारला.स्मृती इराणी या राहुल गांधींच्या विरोधात दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे काँग्रेसने त्यांना चांगलंच लक्ष्य केलं आहे.

First published: April 12, 2019, 11:04 PM IST

ताज्या बातम्या