काँग्रेसचे खासदार संसदेत अंगावर धावून आले स्मृती इराणींचा गंभीर आरोप

काँग्रेसचे खासदार संसदेत अंगावर धावून आले स्मृती इराणींचा गंभीर आरोप

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी अतिशय आक्रमक पद्धतीने आपलं मत मांडलं. त्यावरून काही काँग्रेस खासदार आणि स्मृती इराणींमध्ये आरोप-प्रत्यारोप झालेत.

  • Share this:

नवी दिल्ली 06 डिसेंबर : हैदराबाद एन्काउंटर प्रकरणाचे तीव्र पडसाद आज संसदेतही उमटले. काही खासदारांनी याचा विरोध केला तर काही खासदारांनी पोलिसांच्या कृतीचं समर्थन केलं. काँग्रेसच्या खासदारांनी उत्तरप्रदेशातलं उन्नाव बलात्कार प्रकरण उपस्थित करत योगी आदित्यनाथ सरकारवर हल्लाबोल केला. त्यावरून भाजप आणि काँग्रेसच्या खासदारांमध्ये चांगलीच जुंपली. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी अतिशय आक्रमक पद्धतीने आपलं मत मांडलं. त्यावरून काही काँग्रेस खासदार आणि स्मृती इराणींमध्ये आरोप-प्रत्यारोप झालेत. त्यानंतर स्मृती इराणी यांनी काँग्रेसच्या खासदारांवर गंभीर आरोप केला. काही खासदार बाह्या सरसावून आपल्या अंगावर धावून आले होते असा गंभीर आरोप त्यांनी केला. विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी म्हणाले, एकीकडे राम मंदिर उभारण्याच्या गोष्टी सुरू असतानाच देशात सीतेला जाळण्यात येत आहे. त्यावर स्मृती इराणींचा पारा चढला. त्या म्हणाल्या, प्रकरण अतिशय गंभीर असताना त्याचं राजकारण करू नये. त्यावरून काही काँग्रेस खासदार आणि त्यांच्यात चांगलीच चकमक उडाली, काँग्रेसेचे काही खासदार त्यांच्या दिशेने येत असल्याचंही दिसलं.

हैदराबाद Encounter : आरोपींना पोलिसांनी मध्यरात्रीचं का नेलं घटनास्थळी?

त्यानंतर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सर्व सदस्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं. तर राष्ट्रवादीच्या खसदार सुप्रिया सुळे यांनी काँग्रेसच्या खासदारांना शांत करण्याचा प्रयत्न केला. केवळ मी भाजपची महिला खासदार असल्यामुळेच काँग्रेस माझ्याशी असं वर्तन करत आहे का? असा सवाल स्मृती इराणींनी केला.

मुख्यमंत्र्यांना मिळाला होता तसा सल्ला

दरम्यान, तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या ट्विटवर चार दिवसांपूर्वी एका युजरने दिलेली प्रतिक्रिया व्हायरल होत आहे. यामध्ये त्या युजरने ज्या प्रमाणे सल्ला दिला होता अगदी तसाच एन्काऊंटर झाल्याने याची चर्चा सुरू आहे.

पोलिस आयुक्त व्ही. सी. सज्जनार म्हणाले की, 'आरोपींनी हा गुन्हा कसा केला आहे याविषयी विचारत असताना त्यांनी आमच्यावर हल्ला केला आणि घटनास्थळापासून पळ काढण्याचा प्रयत्न केला. आम्ही त्यांना शरण जायला सांगितलं तरीही ते थांबले नाहीत. दुसरा कोणताही पर्याय नसल्याने आम्हाला त्यांच्यावर गोळीबार करावा लागला आणि त्या सर्वांचा जागीच मृत्यू झाला.'

हैदराबाद : पोलिसांनी सांगितली एन्काउंटरची सगळी कहाणी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनंतर युजरने मुख्यमंत्र्यांना दिलेल्या रिप्लायची चर्चा सुरु झाली. त्याने म्हटले होते की, आरोपींना घटनास्थळी नेऊन तिथं काय झालं ते विचारावे. तेव्हा ते पळून जायचा प्रयत्न करतील त्यावेळी गोळ्या घाला असा सल्ला युजरने दिला होता. आता संबंधित अकाउंट डिलीट कऱण्यात आलं आहे. मात्र, त्याचे स्क्रिनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 6, 2019 05:26 PM IST

ताज्या बातम्या