Home /News /national /

पायात स्लिपर..डोक्यावर गमछा; शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचं वेशांतर

पायात स्लिपर..डोक्यावर गमछा; शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचं वेशांतर

जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: खरं रुप दाखविल्यानंतर सर्वांची शाळाच घेतली.

    रामपुर, 11 ऑक्टोबर : उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यात धान्य खरेदी केंद्रात जिल्हाधिकाऱ्याने अनोख्या पद्धतीने एन्ट्री घेतली. या केंद्रावर जिल्हाधिकारी आन्जनेय कुमार सिंह शेतकऱ्याच्या वेशात पोहोचले. आपल्यामागे केंद्रावरील व्यवहार योग्य पद्धतीने सुरू आहे की नाही, शेतकऱ्यांना कोणकोणत्या समस्यांना सामोरे जावं लागतं हे जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी वेशांतर केलं. पायात हवाई चप्पल आणि चेहऱ्यावर गमछा बांधल्याने आन्‍जनेय यांना कोणीच ओळखी शकलं नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी आपली गाडी लांब थांबवली होती आणि खासगी गाडीतून ते केंद्रावर पोहोचले. बिलासपूर बाजार परिसरात या अनोख्या पद्धतीने सुरू असलेल्या निरीक्षणात अनेक ठिकाणी नियमांचं उल्लंघन केलं जात असल्याचं दिसून आलं. त्यांनी निष्काळजी अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना सामान्य शेतकऱ्याच्या वेशात केंद्र संचालक ओळखू शकले नाही. काही वेळानंतर उपजिल्हाधिकारी बिलासपूर सह अन्य अधिकारी केंद्रावर पोहोचले. त्यावेळी बाजारात आधीच जिल्हाधिकारी आल्याची बाब कळल्यानंतर सर्वांना धक्काच बसला. हे ही वाचा-हाथरस प्रकरणात राहुल गांधींचा योगी सरकारवर हल्लाबोल, म्हणाले लज्जास्पद म्हणजे... बिलासपूर स्थित एनसीसीएफच्या केंद्रावरील नियमांच्या उल्लंघन प्रकरणी केंद्र प्रभारीविरोधात एफआयआर दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. जिल्हाधिकारी आन्जनेय कुमार यांनी सांगितले की, मला सर्वसामान्य व्यक्ती म्हणून येणं आवश्यक होतं. मी शेतकरी म्हणून खासगी गाडीतून तेथे गेलो. बाजारात नियम पाळले जात आहेत की नाही हे जाणून घेणं आवश्यक होतं. यामध्ये जी कमतरता दिसून आली आहे त्यानंतर एका अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर एका समितीचं गठण करण्यात आलं असून ते यांच्या कामावर लक्ष ठेवतील.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Farmer, Uttar pradesh

    पुढील बातम्या