मान्सूनबाबत स्कायमेटनं नोंदवला नवा अंदाज; शेतकरी आणि व्यापाऱ्यांना फटका बसणार?

मान्सूनबाबत स्कायमेटनं नोंदवला नवा अंदाज; शेतकरी आणि व्यापाऱ्यांना फटका बसणार?

आधीच पाणीटंचाईचं संकट डोक्यावर असताना शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशा येण्याची चिन्हं आहेत. भारतात कसा असेल मान्सून? स्कायमेटनं काय वर्तवला अंदाज?

  • Share this:

नवी दिल्ली, 3 एप्रिल: उन्हाच्या झळांनी हैराण असलेल्या नारिकांना अजून एक चटका बसण्याची शक्यता आहे. आधीच राज्यात असणाऱ्या पाणीटंचाईमुळे शेतकरी आणि ग्रामस्थांना वणवण करावी लागत आहे. आता त्यात भर पडली आहे ती स्कायमेटने वर्तवलेल्या अंदाजाची. यंदा विदर्भ मराठवाड्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज IMD ने वर्तवला आहे. यंदा मान्सूनवर अल निनो वादळाचा परिणाम जाणवेल असा स्कायमेटचा अंदाज आहे.

स्कायमेटने वर्तवलेला अंदाज खरा ठरला तर याचा सगळ्यात मोठा फटका शेतकरी-व्यापारी वर्गाला बसण्याची चिन्हं आहेत.

स्कायमेटच्या म्हणण्यानुसार प्रशांत महासागरात कोरड्या-उष्ण वाऱ्यांचं प्रमाण मार्च ते मे महिन्यादरम्यान अधिक असण्याची चिन्हं आहेत. मार्च ते मे महिन्यात अल निनो वादळाचा परिणाम 80 टक्के राहण्याची शक्यता आहे. जून ते ऑगस्टदरम्यान वादळाची तीव्रता कमी होईल तर सप्टेंबरमध्ये चांगला मान्सून होण्याचा अंदाज स्कायमेटनं वर्तवला आहे.

भारतात 70 टक्के पाऊस हा जून ते सप्टेंबरदरम्यान होतो. जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून केरळमध्ये आणि त्यानंतर महाराष्ट्रात येतो. मात्र यंदा मान्सूनवर अल नीनोचा प्रभाव असल्यानं कमी पावसाचा अंदाज वर्तवला आहे

कुठे कसा असेल पावसाचा अंदाज ?

मध्य प्रदेशच्या उज्जैन, भोपाल, रतलाम, इंदौर - कमी पावसाची शक्यता

महाराष्ट्र- विदर्भ, मराठवाडा कमी पावसाचा अंदाज

कर्नाटक- कमी पावसाचा अंदाज

बिहार, झारखंड, प. बंगाल- कमी पावसाचा अंदाज

छत्तीसगड , ओडिशा, आंध्र प्रदेश- सरासरी पावसाचा अंदाज

जून-जुलै महिन्यात होणारा पाऊस हा कमी असेल मात्र त्यानंतर सरासरी पाऊस पडण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात बऱ्यापैकी पाऊस चांगला पडू शकतो. असं स्कायमेटनं वर्तवलं आहे. प्रशांत महासागरातील वाढत्या गरम वाऱ्यांमुळे पावसाचा अचूक अंदाज वर्तवणं कठीण होत चाललं आहे. 2030 पर्यंत मान्सून केव्हा येईल याबाबत स्कायमेटचा अभ्यास सुरू आहे. स्कायमेटचे उपाध्यक्ष महेश पालवत यांनी न्यूज 18 लोकमतला अशी माहिती दिली आहे

VIDEO: प्रकाश आंबेडकर म्हणाले..'पत्नीला न्याय दिला नाही, ते तुम्हाला काय न्याय देणार?'

First Published: Apr 3, 2019 05:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading