'या' राज्यांना बसणार वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा तडाखा

'या' राज्यांना बसणार वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा तडाखा

वाढत्या उन्हाच्या आणि पाणीटंचाईच्या झळा, विदर्भात उष्णतेचा लाट येणार

  • Share this:

उत्तरेतील हवामान बदलामुळे उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये हलका मध्यम आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात विदर्भात त्याच वेळी मोठ्या प्रमाणात उष्णता वाढण्याची चिन्हंही स्कायमेटनं वर्तवली आहेत. नागपूर, चंद्रपूर, परभणी, अमरावती, गोंदिया भंडारा इथे तापमान पुढचे दोन दिवस 45 ते 47 अंश सेल्सियस असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना कामाशिवाय बाहेर न पडण्याचं आवाहन प्रशासनाकडून देण्यात आलं आहे.

स्कायमेटचा अंदाज काय सांगतो...

विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट अनुभवण्यात येईल.

पंजाब, हरियाणा, राजस्थान, पश्चिम उत्तर प्रदेश, दिल्ली वादळीवाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज

उत्तर पूर्व भारत, सिक्कीम, ओडिशाच्या किनारी भागात, केरळ, आंतरिक तामिळनाडू आणि दक्षिण आंतरिक कर्नाटकात हलक्या पावसाच्या सरी

तर स्कायमेटच्या अंदाजानुसार 24 तासांत नोंद करण्यात आलेल्या स्थिती प्रमाणे

विदर्भात दोन ठिकाणी उष्णतेची लाट

आसम, मणिपूर आणि मिझोराममध्ये हलक्या पावसाच्या सरी

हवामानातील बदलामुळे मुंबईत 24 ते 26 मे दरम्यान कोकण आणि मुंबईत हलक्या पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज स्कायमेटनं वर्तवला आहे.

SPECIAL REPORT : सरकारी अधिकाऱ्यांनी करून दाखवली भुताटकी करामत!

First published: May 17, 2019, 7:43 AM IST
Tags: weather

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading