बिहारमध्ये चमकी तापामुळे 60 मुलांचा मृत्यू

बिहारमध्ये चमकी तापामुळे 60 मुलांचा मृत्यू

बिहारमध्ये 60 मुलांचा चमकी तापामुळे मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची दखल केंद्रानं घेतली आहे.

  • Share this:

पाटणा, 14 जून : बिहारमध्ये एईएस व्हायरसमुळे 60 मुलांना आपला जीव गमवावा लागला आहे. मागील 24 तासांमध्ये 8 मुलांचा मृत्यू झाला आहे. तर, 23 मुलांना मुझ्झफ्फरनगरमधील रूग्णालयामध्ये भरती करण्यात आलं आहे. तर, दुसरीकडे 24 तासामध्ये 30 मुलांना उपचाराअंती घरी सोडण्यात आलं आहे. रूग्णालय देखील मुलांवर उपचार करताना सर्व गोष्टींची खबरदारी घेत आहे. दरम्यान, मुलांना घरी सोडताना त्यांना अ‍ॅम्ब्युलन्स सेवा देखील मोफतमध्ये दिली जात आहे. तर, रूग्णालयामध्ये दाखल असलेल्या मुलांच्या पालकांना मोफतमध्ये जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.Loading...

केंद्रानं घेतली दखल

बिहारमध्ये तापाच्या साथीनं आतापर्यत 60 मुलांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची दखल ही केंद्रानं देखील घेतली आहे. या साऱ्या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी केंद्रानं एक टीम मुझ्झफ्फरनगर दौऱ्यावर पाठवली होती. बुधवारी आणि गुरूवारी या टीमनं साऱ्या परिस्थितीचा आढावा घेतला. दोन दिवस सर्व माहिती घेतल्यानंतर टीम दिल्लीला पोहोचली. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा या टीमकडून दिल्या जाणाऱ्या रिपोर्टवरती आहेत.

केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी देखील हे प्रकरण गांभीर्यानं घेतलं आहे. हर्षवर्धन देखील बिहार दौऱ्यावर येणार होते. पण, काही कारणास्तव त्यांनी आपला बिहार दौरा रद्द केला आहे. केंद्रानं पाठवलेल्या टीमच्या अहवालानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन बिहार दौरा करणार असल्याची माहिती आहे.


राज ठाकरेंचा 51वा वाढदिवस, सिद्धिविनायकाचं घेतलं दर्शन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: bihar
First Published: Jun 14, 2019 10:26 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...