नवी दिल्ली, 13 डिसेंबर: कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे (Corona Virus) संपूर्ण देशभर शाळा आणि महाविद्यालये गेल्या नऊ महिन्यापासून बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना बऱ्याच अडचणींचा (Student Problems) सामना करावा लागत आहेत. अशातच डिजीटल (E-Learning) माध्यमाचा पर्याय उपलब्ध झाल्याने देशातील काही महाविद्यालये ऑनलाइन वर्ग (Online classes) भरवत आहेत. पण ऑनलाइन क्लासमध्ये अश्लील व्हिडीओ (Porn Video) सुरू होण्याची घटना विदेशात यापूर्वी घडली होती. असाच एक प्रकार भारतातील दुमका येथील सिदो कान्हु मुर्मू विद्यापीठात (sido kanhu murmu university) घडला आहे.
झारखंडमधील (Jharkhand) दुमका येथील सिदो कान्हु मुर्मू विद्यापीठात (sido kanhu murmu university) मानवाधिकार (Human Rights) या विषयावर एक वेबिनार (Webinar) आयोजित केला होता. हा वेबिनार चालू असताना अचानक अश्लील व्हिडीओ (Porn Video) सुरू झाला. ही घटना फक्त एकदा घडली असं नाही तर वेबिनार दरम्यान किमान सहा वेळा हा प्रकार घडला. त्यामुळे वेबिनारमध्ये भाग घेणाऱ्या अनेकांना मनस्तापाला सामोरं जावं लागलं आहे. हा प्रकार बर्याच वेळा सुरू झाल्याने यासंदर्भात विद्यापीठ प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आहे.
गुरुवारी जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त हा वेबिनार आयोजित केला होता. वेबिनार सुरू असताना कुणीतरी 6 वेळा अश्लील व्हिडीओ चालवल्याची तक्रार विद्यापीठ प्रशासनाकडे केली असल्याचं दुमका पोलीस अधीक्षक अंबर लकडा यांनी सांगितलं. तसेच ते म्हणाले की, सिदो कान्हु मुर्मू विद्यापीठात 'इंटरनल क्वालिटी एश्योरेंस सेल'च्या वतीनं हा वेबिनार आयोजित करण्यात आला होता. विद्यापीठाने केलेल्या पोलीस तक्रारीनुसार, वेबिनारमध्ये किमान अर्धा डजन वेळा कुणीतरी अश्लील व्हिडीओ चालवला, ज्यामुळे वेबिनारमध्ये भाग घेणाऱ्या सर्व लोकांना मनस्ताप झाला.