अफगाणिस्थानात वीजेच्या प्रकल्पावर काम करणाऱ्या 6 भारतीयांचं अपहरण

अफगाणिस्तानमध्ये रविवारी सकाळच्या सुमारास बागलान प्रांतातून काही अज्ञात बंदुकधाऱ्यांनी एका भारतीय कंपनीच्या सात कर्मचाऱ्यांचे अपहरण केले असून यात सहा कर्मचारी हे भारतीय तर एक जण हा अफगाणिस्तानचा आहे.

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: May 7, 2018 09:49 AM IST

अफगाणिस्थानात वीजेच्या प्रकल्पावर काम करणाऱ्या 6 भारतीयांचं अपहरण

07 मे : अफगाणिस्थानात एका वीजेच्या प्रकल्पावर काम करणाऱ्या सहा भारतीयांचं अपहरण करण्यात आलं आहे. अफगाणिस्तानमध्ये रविवारी सकाळच्या सुमारास बागलान प्रांतातून काही अज्ञात बंदुकधाऱ्यांनी एका भारतीय कंपनीच्या सात कर्मचाऱ्यांचे अपहरण केले असून यात सहा कर्मचारी हे भारतीय तर एक जण हा अफगाणिस्तानचा आहे.

केईसी असे या भारतीय कंपनीचे नाव आहे. अफगाणिस्तानच्या 'टोलो न्यूज' या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, बागलान प्रांताची राजधानी पुल-ए-खोमरेमधील बाग-ए-शामल गावातून या कर्मचाऱ्यांचे अपहरण करण्यात आले आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे कर्मचारी प्रवासात असताना ही घटना घडली.

या परिसरात भारतीय कंपनीला वीज उपकेंद्राचे काम मिळालेले आहे. बागलान प्रांताने या घटनेमागे तालिबानी दहशतवादी संघटनेचा हात असल्याचे म्हटले आहे. अद्यापपर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेने या घटनेची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

दरम्यान, न्यूज 18ला दिलेल्या एका मुलाखतीत परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, "आम्ही अफगाणिस्तानमधील बागलान प्रांतामधील भारतीय नागरिकांच्या अपहरणाची जाणीव आहोत. आम्ही अफगाणिस्तानच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत आणि सविस्तर माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत आहोत.

सुत्रांच्या माहितीनुसार, अफगाणिस्तानमध्ये खंडणीसाठी लोकांचं अपहरण करणं म्हणजे एक सामान्य बाब आहे. वाढती गरीबी आणि बेरोजगारी यामुळे तर परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. तथापि, अद्याप कोणत्याही संघटनेने अपहरणाची जबाबदारी घेतलेली नाही आणि त्यांच्या सुटकेसाठी खंडणीची मागणीही केलेली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 7, 2018 09:49 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...