पत्नी ओरडत होती 'प्लीज कोणीतरी वाचवा' लोक काढत राहिले VIDEO, पतीने कुशीतच सोडला जीव

पत्नी ओरडत होती 'प्लीज कोणीतरी वाचवा' लोक काढत राहिले VIDEO, पतीने कुशीतच सोडला जीव

मृत व्यक्ती कोलकाता इथे टायर व्यावसायिक असल्याचे सांगितले जात आहे. रविवारी दुपारी तीन वाजता ही घटना घडली.

  • Share this:

पटना, 09 डिसेंबर : भर दिवसा रेल्वे स्थानकात पत्नीसमोर एका व्यक्तीला गोळ्या घालून ठार करण्यात आलं. पतीला गोळी लागल्याचं पाहताच पत्नीने हंबरडा फोडला आणि लोकांकडे मदत मागितली पण माणूसकी मेलेल्या लोकांनी महिलेला मदत केली नाही. अखेर पत्नीच्या मांडीवरच पतीने जीव सोडला. नवऱ्याचे डोके मांडीवर ठेवून, नवविवाहित पत्नी मदतीसाठी याचना करत राहिली, परंतु गर्दी पाहणारे लोक व्हिडिओ काढत राहिले. पीडितेला रुग्णालयात नेण्याची कोणालाही पर्वा नव्हती.

मृत व्यक्ती कोलकाता इथे टायर व्यावसायिक असल्याचे सांगितले जात आहे. रविवारी दुपारी तीन वाजता ही घटना घडली. जेव्हा मृतक मोहम्मद फैजल त्याच्या नवविवाहित पत्नी अंजुम खातूनसमवेत बाघ एक्स्प्रेसने कोलकाता जाण्यासाठी थांबला होता. दरम्यान, एका अज्ञात इसमाने प्लॅटफॉर्म क्रमांक 1वर असलेल्या फैजलला मागून गोळ्या घातल्या. क्षणात फैजल खाली पडला. पत्नी अंजुमने ताबडतोब फैजलचे डोके तिच्या मांडीवर ठेवले आणि लोकांच्या मदतीसाठी सतत प्रार्थना करत राहिली.

'कृपया कोणीतरी मदत करा'

'कृपया कोणीतरी वाचवा, कृपया कुणाला तरी मदत करा' असं अंजुम ओरडत राहिली पण लोकांनी मात्र याचा व्हिडिओ बनवून व्हायरल केला. तिच्या या मदतीच्या आवाजाने कोणाच्याही हृदयाला पाझर फुटला नाही. थोड्या वेळाने अंजुमची चौकशी करत एक पोलीस आला पण त्यानेही पीडितेला दवाखान्यात नेण्याची चपळता दाखविली नाही. अखेर फैजलचा मृत्यू झाला.

इतर बातम्या - हैदराबादप्रमाणे आरोपीचा एन्काऊंटर करा, बलात्कार, हत्येनंतर नागपूर तापलं

6 महिन्यांपूर्वी झाले होते लग्न

सुलतानपूर येथे तिच्या सासरहून कोलकाताला ट्रेन पकडण्यासाठी निघाली असल्याचं पत्नीने पोलिसांना सांगितले. मुझफ्फरपूर एसआरपी संजय कुमार यांनी सांगितले की, फैजलचे 6 महिन्यांपूर्वी लग्न झाले होते आणि तो पत्नीला घेण्यासाठी कोलकाताहून सीवान इथे आला होता. तर अद्याप हत्येमागील कारण समजू शकलेले नाही. असंही ते म्हणाले.

इतर बातम्या - महाराष्ट्रात आणखी एक बलात्काराची घटना, अल्पवयीन मुलीवर जबरदस्ती अत्याचार

प्लॅटफॉर्मवर सीसीटीव्ही नाही

आश्चर्य म्हणजे रेल्वे प्लॅटफॉर्मवर कोणताही सीसीटीव्ही कॅमेरा बसलेला नाही. एसआरपी म्हणाले, "स्टेशनवर कॅमेरे बसवण्याचे काम सुरू आहे." ते म्हणाले की आरोपींना ओळखण्यासाठी जवळपासच्या दुकानातून काही व्हिडीओ क्लिप घेण्यात आल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 9, 2019 01:03 PM IST

ताज्या बातम्या