मोदी, मोदी असा नारा देत घातला दरोडा; कुटुंबीयांना केली मारहाण

मोदी, मोदी असा नारा देत घातला दरोडा; कुटुंबीयांना केली मारहाण

बिहारमध्ये दरोड्याची एक विचित्र प्रकारची घटना उघडकीस आले आहे.

  • Share this:

सिवान, 05 मे: बिहारमध्ये दरोड्याची एक विचित्र प्रकारची घटना उघडकीस आले आहे. विचित्र म्हणण्याचे कारण असे की, एका गावात दरोडेखोरांनी घरात प्रवेश करताना चक्क मोदी, मोदी असा नारा दिला आणि त्यानंतर घरातील मुद्देमालाची लूट केली.

बिहालमधील सिवान जिल्ह्यातील घुरघाट गावात काही गुंडांनी मोदी, मोदीचा नारा देत एका घराचा दरवाजा उघडवण्यास लावले. त्यानंतर त्यांनी घरात प्रवेश करत लुटमार केली. या कुटुंबातील एक सदस्य असलेले उपेंद्र राज यांनी सांगितले की, दरोडेखोरांनी मोदी, मोदींचा नारा दिला. आम्ही दरवाजा उघडल्यानंतर त्यांनी घरात प्रवेश करत प्रथम मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी घरातील लोकांना मारहाण देखील केली.

दरवाजा उघडताना आम्हाला वाटले की प्रचार करण्यासाठी कोणी तरी आले असेल. पण दरवाजा उघडताच त्यांनी घरात प्रवेश केला आणि दोन महिला व दोन पुरुषांना गंभीर मारहाण केली. दरोडेखोरांनी घरातील लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरल्याचे उपेंद्र यांनी सांगितले.

या घटनेचे वृत्त कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. ज्या घरात दरोडा टाकण्यात आला आहे, त्यांच्या मते दरोडेखोरांनी मोदी, मोदी असा नारा दिला होता. पण हे किती सत्य आहे याची चौकशी सुरू असल्याचे पोलीस अधिकारी राम बालक यादव यांनी सांगितले. या घटनेबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला असून चौकशीसाठी एक पथक तयार करण्यात आले आहे.


Loading...

SPECIAL REPORT: बच्चे कंपनीची राजकीय जुगलबंदी, '...लाव रे तो व्हिडिओ'
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 5, 2019 06:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...