राहुल गांधी हे राजकारणातले Intern, माजी सहकाऱ्यानेच केली बोचरी टीका

'राहुल यांच्या ऐवजी प्रियंका गांधी अध्यक्ष असत्या तर काँग्रेसची अशी दयनीय अवस्था झाली नसती.'

News18 Lokmat | Updated On: Nov 3, 2019 11:43 PM IST

राहुल गांधी हे राजकारणातले Intern, माजी सहकाऱ्यानेच केली बोचरी टीका

नवी दिल्ली 3 नोव्हेंबर : भारतीय राष्ट्रीय कांग्रेसचे (Indian National Congress) माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर होणारी टीका अजूनही थांबत नाहीये. राहुल गांधींचे माजी सहकारी  पंकज शंकर (Pankaj Shankar) यांनी राहुल यांच्या नेतृत्वावरच प्रश्न चिन्ह निर्माण केलंय. 2004मध्ये राहुल गांधी राजकारणात आले होते. मात्र आज 15 वर्षानंतरही ते राजकारणात Intern सारखेच कच्चे आहेत. त्यांची इंटरर्नशीप केव्हा संपणार ते माहित नाही अशी टीकाही त्यांनी केली. राहुल यांच्या ऐवजी प्रियंका गांधी अध्यक्ष असत्या तर काँग्रेसची अशी दयनीय अवस्था झाली नसती असंही ते म्हणाले. शंकर पुढे म्हणाले, युथ कांग्रेस (Youth Congress) आणि एनएसयूआय (NSUI) मध्ये अनेक प्रयोग करण्यात आले. पण ते निष्फळ ठरले. खुद्द अमेठीतच (Amethi) राहुल गांधी हरले.

Loading...

आता प्रयोग करायला काहीच शिल्लक नाही. हे सगळं फक्त पुत्र मोहापायी सुरू आहे अशी टीकाही त्यांनी केली. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेस 3 वरून 2 आकड्यांवर आला. आता किती खाली जाणार काय माहित असंही ते म्हणाले.

संजय राऊत घेणार राज्यपालांची भेट, सत्तास्थापनेसाठी देणार 'हा' प्रस्ताव

राहुल यांच्या ऐवजी प्रियंका गांधी यांच्याकडे नेतृत्व असतं तर काँग्रेसची ही दशा झाली नसती हे काँग्रेस पक्षातच नाही तर विरोधी पक्षातही मत व्यक्त होईल असंही ते म्हणाले. लोकसभेत काँग्रेसने सपाटून मार खाल्ल्यानंतर राहुल गांधी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर सोनिया गांधी यांच्याकडे काँग्रेसचा कार्यभार देण्यात आला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 3, 2019 11:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...