Home /News /national /

Navjot Singh Sidhu वर बहिणीचे गंभीर आरोप; प्रॉपर्टीसाठी आईलाही...

Navjot Singh Sidhu वर बहिणीचे गंभीर आरोप; प्रॉपर्टीसाठी आईलाही...

Navjot Singh Sidhu यांच्या आईचा दिल्लीच्या रेल्वे स्टेशनवर बेघर म्हणून मृत्यू झाल्याची बाबही समोर आली आहे.

    नवी दिल्ली, 28 जानेवारी : पंजाब काँग्रेस अध्यक्ष नवजोत सिंह सिद्धू (Punjab Congress President Navjot Singh Sidhu) यांच्यावर त्यांच्या बहिणीने अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यांची मोठी मुलगी सुमन तूरने सांगितलं की, सिद्धू यांनी आपल्या आईला म्हातारपणी केवळ पैशांसाठी सोडून दिलं. अमेरिकेत राहणाऱ्या सुमन तूर यांनी नवजोत सिंग सिद्ध यांना क्रूर व्यक्ती म्हटलं आहे. त्या पुढे म्हणाल्या की, 1986 मध्ये वडिलांच्या मृत्यूनंतर सिद्धूंनी आपल्या आईला सोडून दिलं आणि 1989 मध्ये दिल्ली रेल्वे स्टेशनवर एक बेघर महिला म्हणत त्यांचा मृत्यू झाला. माझ्याकडे पुरावे... सध्या सुमन तूर या चंदीगडमध्ये आहेत. येथे त्यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी नवजोत सिंग सिद्धू यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. 1986 मध्ये वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांनी आईला घराबाहेर काढलं होतं. तूरनी दावा केला आहे की, त्यांच्या आईचा 1989 मध्ये दिल्ली रेल्वे स्टेशनवर मृत्यू झाला. सुमन तूर पुढे म्हणाल्या की, आम्ही खूप कठीण काळ पाहिला आहे. माझी आई 4 महिने रुग्णालयात होती. मी जे काही म्हणत आहे त्याचे सर्व पुरावे माझ्याजवळ आहेत. हे ही वाचा-भारतातील सफाई कामगारांचे सर्वात मोठे सर्वेक्षण; समोर आली धक्कादायक माहिती सिद्धू खोटा आहे... सुमन तूप पुढे म्हणाल्या की, सिद्धूने संपत्तीसाठी तिच्याशी नातं तोडलं. माझ्या वडिलांनी पेन्शन व्यतिरिक्त आणखी एक घर आणि जमिनीसह संपत्ती ठेवली होती. सिद्धूने पैशांसाठी आईला सोडलं. आम्हाला त्याच्याकडून पैसे नकोत. सिद्धूने 1987 मध्ये इंडिया टुडेसोबत एका मुलाखतीत त्याचे आई-वडील वेगळं झाल्याचं सांगितलं होतं. मात्र ते पूर्णत: खोटं आहे. सिद्धूच्या या दाव्यानंतर आमच्या आईने न्यायालयाचं दार ठोठावलं होतं. त्या पुढे म्हणाल्या की, 20 जानेवारी रोजी मी सिद्धूला भेटायला गेले होते. मात्र त्यांनी मला भेटण्यास नकार दिला. सिद्धू संपर्क करीत नसल्यामुळे मला ही पत्रकार परिषद घ्यावी लागली. त्यांनी फोन ब्लॉक केल्यामुळे मला पत्रकार परिषद घ्यावी लागली.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या