Home /News /national /

Letter World Record : बहिणीने भावाला लिहिले 434 मीटर लांब पत्र, 5 किलो पत्राचे वजन

Letter World Record : बहिणीने भावाला लिहिले 434 मीटर लांब पत्र, 5 किलो पत्राचे वजन

केरळमधील कृष्णप्रिया तिचा भाऊ कृष्णप्रसादला दरवर्षी ब्रदर्स डेनिमित्त शुभेच्छा (Brothers day wishes) द्यायची.

    तिरुवनंतपुरम, 1 जुलै : प्रत्येक भाऊ-बहिणीत गोड भांडणे (Brother Sister Fight) होत असतात. यानंतर बहिण भावाला (Brother) मनवते किंवा भाऊसुद्धा बहिणीला मनवतो. भाऊ-बहिणीच्या भांडणात एका बहिणीने (Sister) आपल्या भावाचे मन वळवण्यासाठी अनोखी पद्धत अवलंबली आहे. केरळमधील कृष्णप्रिया तिचा भाऊ कृष्णप्रसादला दरवर्षी ब्रदर्स डेनिमित्त शुभेच्छा (Brothers day wishes) द्यायची. मात्र, यंदा ती विसरली. यामुळे तिच्या भावाला राग आला. अनेक प्रयत्न करूनही त्याचा राग न गेल्याने कृष्णप्रियाने पत्र लिहून भावाला मनवण्याचे ठरवले. ही घटना इडुक्की जिल्ह्यातील आहे. कृष्णप्रियाने सांगितले की, तिला अनेक गोष्टी सांगायच्या होत्या. म्हणूनच तिने 14 बिलिंग रोलमध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या. या पत्राचे वजन पाच किलोग्रॅम असून लांबी 434 मीटर आहे. हे जगातील सर्वात लांब पत्र असल्याचे मानले जाते. बहीण 'बर्थ डे'च्या शुभेच्छा द्यायला विसरली - कृष्णप्रियाच्या म्हणण्यानुसार, ती यावर्षी 'आंतरराष्ट्रीय ब्रदर्स डे' निमित्त तिचा छोटा भाऊ कृष्णप्रसादला शुभेच्छा देण्यास विसरली. यामुळे नाराज झालेल्या तिच्या भावाने तिला व्हॉट्सअॅपवर ब्लॉक केले. यानंतर त्याने आपल्या भावाला एक लांब आणि जड पत्र लिहिले. युनिव्हर्सल रेकॉर्ड फोरमच्या मते, कृष्णप्रिया यांनी आतापर्यंतचे सर्वात मोठे पत्र लिहिले आहे. भावाच्या नाराज होण्याचे कारण काय - कृष्णप्रसाद याने आपली बहिण कृष्णप्रियाला काही संदेश पाठवले होते. मात्र, तिने त्याकडे लक्ष दिले नाही. यानंतर त्याला इतरांनी ब्रदर्स डेच्या शुभेच्छा दिल्या, हे बहिणीला कळवण्यासाठी त्याने काही स्क्रीनशॉट देखील तिला पाठवले. मात्र, यानंतरही तिने रिप्लाय न केल्यामुळे किंवा ब्रदर्स डेच्या शुभेच्छा दिल्या नाहीत, म्हणून त्याने आपली बहीण कृष्णप्रियाला व्हॉट्सअॅपवर ब्लॉक केले. हेही वाचा - Mobile radiations: मोबाईल-लॅपटॉपचा अतिरेक झालाय; गंभीर आजार टाळण्यासाठी अशी घ्या काळजी याप्रकरणी तिने सांगितले की, मी त्याला शुभेच्छा द्यायला विसरले. नेहमी मी त्याला ब्रदर्स डेला फोन करायची किंवा मेसेज पाठवायची. मात्र, यावर्षी माझ्या व्यस्त वेळापत्रकामुळे माझ्या लक्षात राहिले नाही. यानंतर मी पाहिले की त्याने मला त्याला इतरांनी शुभेच्छा दिल्याचे स्क्रिनशॉट्स पाठवले आहेत. आमचे नाते आई-मुलासारखे आहे. मात्र, त्याने माझ्याशी बोलणे बंद केल्याने मला वाईट वाटले. इतकेच नव्हे त्याने तर मला व्हॉट्सअॅपलाही ब्लॉक केले. तिला तिच्या भावाची इतकी आठवण येत होती की, तिने 25 मे रोजी त्याला पत्र लिहायला सुरुवात केली. पत्र लिहिण्यासाठी तिने आधी ए4 साइजच्या कागद घेतला. मात्र, आपल्या भावनांपुढे पेपर कमी पडणार हा लवकरच त्याच्या लक्षात आले. मात्र, तिला एकही लांबलचक कागद न मिळाल्याने त्यांनी बिलिंग रोलवरच पत्र लिहायला सुरुवात केली. तिने 15 रोल विकत घेतले आणि त्या सर्वांवर तिच्या मनातील भावना व्यक्त केली. यासाठी तिला 12 तास लागले. अशाप्रकारे तिने आपल्या भावासमोर आपली भावना व्यक्त केली.
    Published by:News18 Desk
    First published:

    पुढील बातम्या