Home /News /national /

भावाला वाचवण्यासाठी धावलेल्या बहिणीवर काळाचा घाला; मशीनमध्ये ओढणी अडकली आणि...

भावाला वाचवण्यासाठी धावलेल्या बहिणीवर काळाचा घाला; मशीनमध्ये ओढणी अडकली आणि...

चंद्रपुरातील एका निराधार मायलेकीचा अन्नावाचून तडफडून मृत्यू झाला आहे.

चंद्रपुरातील एका निराधार मायलेकीचा अन्नावाचून तडफडून मृत्यू झाला आहे.

भावाला तीनं वाचवलंसुद्धा, मात्र आलेल्या संकटात बहिणीला प्राणाशी मुकावं लागलं. भावाला वाचवण्याच्या प्रयत्नात या बहिणीनं स्वतःचा जीव (Sister death) गमावला.

    धर्मशाला, 26 मे : आपला भाऊ संकटात असल्याचं पाहून त्याची बहीण त्याला वाचवण्यासाठी धावून आली. भावाला तीनं वाचवलंसुद्धा, मात्र आलेल्या संकटात बहिणीला प्राणाशी मुकावं लागलं. भावाला वाचवण्याच्या प्रयत्नात या बहिणीनं स्वतःचा जीव (Sister death) गमावला. या घटनेनं सर्वजण हळहळ व्यक्त करत असले तरी तिला त्यावेळी कोणीच वाचवू शकलं नसल्यानं अनेकजण खंत व्यक्त करत आहेत. रस्त्याचं काम सुरू असताना ही दुर्दैवी घटना घडली. रस्त्यांच्या कामाची मशीन जोर-जोरात वाजत असल्यानं सुरुवातीला आजूबाजूच्या लोकांना काय होतंय हे कळलंच नाही. हिमाचल प्रदेशमधील बिलासपूर (Bilaspur) गावात ही दुर्घटना घडली. धर्मशाळा जिल्ह्यातील हरिपूर पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात हा परिसर येतो. झालं असं की, एक लहान मुलगा रस्त्याचं काम सुरू असताना नेमका खेळत-खेळत मोठ्या मशीनजवळ गेला होता. मशीनला त्यानं कदाचित हात लावला असता तर मोठा अपघात होण्याची शक्यता होती. या मुलाला मात्र त्याची कल्पना नव्हती, हा मुलगा मशीनजवळ पोहचल्याचे पाहून त्याची 19 वर्षीय बहीण धावत पळत त्याच्याजवळ पोहोचली. तोपर्यंत हा मुलगा मशीनच्या बराच जवळ पोचला होता. तिनं कसं-बसं त्याला तिथून माग ओढलं आणि दोघेही मागे येणार इतक्यात तिची ओढणी मशिनमध्ये अडकली आणि तिला ओढले जाऊ लागले. त्यानंतर तिचे केसही मशीनमध्ये अडकले. त्यामुळे तिनं जोरात आरडाओरडा केला, मात्र काही क्षणात ती मशीनमध्ये ओढली गेली. आरडाओरड ऐकून धावत आलेल्या काहींनी मशीन बंद केली आणि तिला बाहेर घेऊन दवाखान्यात नेण्यात आलं. मात्र, प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचं सांगितले. हे वाचा - महिलांबाबत ते वाक्य जेठालाल यांना पडलं होतं भारी; केली जात होती तुरुंगात टाकण्याची मागणी सरकारी रुग्णालयाकडून याची माहिती नगरोटा सूरिया पोलीस चौकीला देण्यात आली. त्यानंतर पोलीस प्रभारी सुशीलकुमार यांनी घटनास्थळी जाऊन याबाबत सर्व माहिती घेऊन आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून आपल्या भावाला वाचवणाऱ्या बहिणीचा अशाप्रकारे मृत्यू झाल्यानं अनेकांनी शोक व्यक्त केला.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Accident, Himachal pradesh

    पुढील बातम्या