टीव्हीच्या रिमोटवरून बहीण-भावाचं भांडण, मोठ्या बहिणीने थेट गळफास लावला

टीव्हीच्या रिमोटवरून बहीण-भावाचं भांडण, मोठ्या बहिणीने थेट गळफास लावला

अलिकडच्या काळात टीव्हीचा रिमोट आणि मोबाईलचा चार्जर हीदेखील भांडणाची कारणं ठरू लागली आहेत.

  • Share this:

घरात बहीण-भावाचं अनेक छोट्या-मोठ्या कारणांसाठी भांडण होत असतं. अलिकडच्या काळात टीव्हीचा रिमोट आणि मोबाईलचा चार्जर हीदेखील भांडणाची कारणं ठरू लागली आहेत.

घरात बहीण-भावाचं अनेक छोट्या-मोठ्या कारणांसाठी भांडण होत असतं. अलिकडच्या काळात टीव्हीचा रिमोट आणि मोबाईलचा चार्जर हीदेखील भांडणाची कारणं ठरू लागली आहेत. (सर्व फोटो प्रातिनिधिक)

दिल्लीत एक हादरून टाकणारी घटना घडली आहे. बहीण-भावामध्ये टीव्हीच्या रिमोटसाठी भांडण झालं आणि बहिणीने स्वत:ला गळफास लावल्याची धक्कायदायक घटना नवी दिल्लीच्या सीमापुरीमध्ये घडली आहे.

दिल्लीत एक हादरून टाकणारी घटना घडली आहे. बहीण-भावामध्ये टीव्हीच्या रिमोटसाठी भांडण झालं आणि बहिणीने स्वत:ला गळफास लावल्याची धक्कायदायक घटना नवी दिल्लीच्या सीमापुरीमध्ये घडली आहे.

सीमापुरीत राहणाऱ्या या कुटुंबातील आई-वडील काही कामानिमित्त घराबाहेर गेले होते. सर्वात मोठा मुलगा 17 वर्षांचा, मुलगी 12 वर्षांची तर लहान मुलगा 7 वर्षांचा असा त्यांचा परिवार आहे. सर्वात मोठा भाऊ एका खोलीत अभ्यास करत बसला होता. तेव्हाच 7 वर्षांच्या छोट्या भावाचं आपल्या 12 वर्षांच्या मोठ्या बहिणीबरोबर रिमोटवरून जोरदार भांडण झालं.

सीमापुरीत राहणाऱ्या या कुटुंबातील आई-वडील काही कामानिमित्त घराबाहेर गेले होते. सर्वात मोठा मुलगा
17 वर्षांचा, मुलगी 12 वर्षांची तर लहान मुलगा 7 वर्षांचा असा त्यांचा परिवार आहे. सर्वात मोठा भाऊ एका खोलीत अभ्यास करत बसला होता. तेव्हाच 7 वर्षांच्या छोट्या भावाचं आपल्या 12 वर्षांच्या मोठ्या बहिणीबरोबर रिमोटवरून जोरदार भांडण झालं.

बहीण-भावाच्या या भांडणानंतर जे झालं ते मात्र फारच धक्कादायक आहे. मोठ्या बहिणीने रागाच्या भरात आधी लहान भावाला एक कानाखाली मारली. नंतर ती बहीण आपल्या खोलीत गेली आणि तिने स्वत:ला फास लावून घेतला.

बहीण-भावाच्या या भांडणानंतर जे झालं ते मात्र फारच धक्कादायक आहे. मोठ्या बहिणीने रागाच्या भरात आधी लहान भावाला एक कानाखाली मारली. नंतर ती बहीण आपल्या खोलीत गेली आणि तिने स्वत:ला फास लावून घेतला.

लहान भावाला या गोष्टीचा अंदाज येताच त्याने हा सगळा प्रकार अभ्यास करत असलेल्या आपल्या मोठ्या भावाला सांगितला. त्यानंतर त्या मोठ्या भावाने सीलिंग फॅनला लटकून फास लावणाऱ्या आपल्या बहिणीला ताबोडतोब खाली उतरवलं आणि रुग्णालयात दाखल केलं. आता या मुलीवर उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 29, 2018 10:41 AM IST

ताज्या बातम्या