हैद्राबाद, 9 ऑगस्ट : हातात पैसे नसतील तर परिस्थिती बऱ्या गोष्टी शिकवून जाते. अनेकदा तर लहानग्यांनाही याची झळ सोसावी लागते. हैद्राबादमधून (Hyderabad) अशीच एक घटना समोर आली आहे. येथील एका 10 वर्षांचा चिमुरडा आपलं रक्षाबंधनाचं कर्तव्य निभावत असताना दिसून येत आहे. ही बातमी वाचून तुम्हीही भावुक व्हाल. ही चिमुरडा रस्त्याच्या शेजारी पक्षांचं खाद्य दाणे (Bird Food) विकत आहे.
बहिणीला आहे ब्रेन कॅन्सर
सैय्यद अजीज (Syed Aziz) नावाच्या या चिमुरड्याची 12 वर्षांची बहीण सकीना ब्रेन कॅन्सरने (Brain Cancer) पीडित आहे. 2 वर्षांपासून ती या आजाराने त्रस्त आहे. मात्र या आजाराच्या उपचारासाठी पैसे जमा करणं खूप आव्हानात्मक आहे. आई-वडील मुलीच्या आजारासाठी पैसे जमा करू शकले नाही, तर या चिमुरड्याने घराचा भार डोक्यावर घेतला आणि बहिणीच्या उपचारासाठी उभं राहण्याचा निर्णय घेतला. तो पक्षांचं खाद्य (दाणे) विकतो. यानंतर तो स्वत:चा अभ्यास करायलाही वेळ काढतो. अजीजने सांगितलं की, मी सकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत पक्षांचं खाद्य विकतो. आणि त्यानंतर मदरशात जातो. (sister is suffering from brain cancer 10 years old brother raising money for her treatment )
Telangana | A 10-yr-old boy sells bird food in Hyderabad to pay for his sister Sakeena Begum's brain cancer treatment.
"We haven't received any help. We received govt funds only till radiation therapy. The medication is too expensive," says Bilkes Begum, Sakeena's mother pic.twitter.com/S5G5l9cKWq — ANI (@ANI) August 6, 2021
हे ही वाचा-धक्कादायक! टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या खेळाडूवर आली मजुरीची वेळ
2 वर्षांपासून कुटुंब संकटात
सैय्यद अजीज आणि सकीना बेगम यांची आई बिलकीस बेगम यांनी सांगितलं की, 2 वर्षांपूर्वी सकीनाला ब्रेन कॅन्सर असल्याचं समोर आलं. तेव्हापासून तिच्यावर उपचार करण्यासाठी सर्व कुटुंब झटत आहे. डॉक्टरांनी जेव्हा सकीनाला कॅन्सर असल्याचं सांगितलं तर आमच्या पायाखालून जमिन सरकली. तेलंगणा सरकारकडून मिळालेले सर्व पैसे आम्ही रेडियाथेरेपीसाठी खर्च केले. मात्र अद्यापही तिच्यावर उपचार पूर्ण झालेला नाही. त्यामुळे पैशांची गरज होतीच. त्यावेळी सैय्यद अजीज म्हणाला की, तो देखील पैसे जमा करण्यासाठी मदत करेल.
केलं मदतीचं आवाहन
या मुलांचे वडील सैय्यद लतीफ बांधकामाचं काम करून घर चालवतात. त्याच्या कुटुंबीयांनी लोकांना मदतीचं आवाहन केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.