मोदी सरकार आता प्लॅस्टिकपासून बनवणार रस्ते, असा आहे हा प्रकल्प

'सिंगल युज' प्लॅस्टिकपासून बनवलेले रस्ते तुलनेने स्वस्त आणि चांगल्या दर्जाचे असतात हे संशोधनात समोर आलं आहे. 'नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया' ने 500 टन प्लॅस्टिक कचऱ्यापासून 100 किलोमीटरचे हायवे बनवण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 3, 2019 04:05 PM IST

मोदी सरकार आता प्लॅस्टिकपासून बनवणार रस्ते, असा आहे हा प्रकल्प

नवी दिल्ली, 3 ऑक्टोबर : गांधी जयंतीच्या निमित्ताने मोदी सरकारने नो प्लॅस्टिक मोहीम सुरू केली आहे. जे प्लॅस्टिक एकदा वापरून टाकून दिलं जातं अशा 'सिंगल युज' प्लॅस्टिकची विल्हेवाट लावण्यासाठी एक पर्याय काढण्यात आला आहे.यामध्ये IOC म्हणजेच इंडियन ऑइल कॉर्पोरेशन या सरकारी कंपनीने पुढाकार घेतला आहे. IOC ने फरिदाबादच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटरच्या बाहेर प्लॅस्टिकपासून 850 मीटरचा रस्ता बनवला आहे.

500 टन कचऱ्यातून 100 किमी हायवे

अशा प्रकारच्या 'सिंगल युज' प्लॅस्टिकपासून बनवलेले रस्ते तुलनेने स्वस्त आणि चांगल्या दर्जाचे असतात हे संशोधनात समोर आलं आहे. 'नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया' ने 500 टन प्लॅस्टिक कचऱ्यापासून 100 किलोमीटरचे हायवे बनवण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे.

हा प्रयोग काश्मीरमध्येही केला जातोय. 270 किमी लांब जम्मू - श्रीनगर हायवे तयार करतानाही अशा प्रकारच्या प्लॅस्टिकचा उपयोग केला जाईल.

प्लॅस्टिकपासून बनवलेल्या रस्त्यांवर 'नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया' ची देखरेख असणार आहे. वर्षातून दोनदा या रस्त्यांचा आढावाही घेतला जाईल.

Loading...

(हेही वाचा : SBI च्या ग्राहकांसाठी मोठी बातमी : ATM मधून विनाशुल्क पैसे काढण्याचा नियम बदलला)

धोला कुआँ ते एअरपोर्ट

7 टन प्लॅस्टिकच्या कचऱ्यापासून 1 किलोमीटर रस्ता बनतो.दिल्लीमधल्या धौला कुआँ पासून एअरपोर्टला जाणाऱ्या रस्त्यालगत एक किलोमीटरची सर्व्हिस लेन प्लॅस्टिकच्या कचऱ्यापासूनच बनवली आहे.

बंगळुरूचे राजुल खान यांनी प्लॅस्टिकपासून रस्ते बनवण्याचा हा प्रयोग यशस्वी करून दाखवला. त्यांनी बंगळुरूमध्ये प्लॅस्टिकपासून 3 हजार किमीचे रस्ते बनवले आहेत. आता त्यांची मदत घेऊनच सरकारने हा प्रकल्प हाती घेतला आहे. देशभरात प्लॅस्टिक कचरा गोळा करण्यासाठी मोठं श्रमदान केलं गेलं. या माध्यमातून 18 हजार किलो प्लॅस्टिकचा कचरा गोळा झाला आहे.

====================================================================================

उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी महादेव जानकरांनी केलं औक्षण, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 3, 2019 04:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...