मराठी बातम्या /बातम्या /देश /

देशातील कोरोनाबाधितांची संख्या 23 लाख पार, 24 तासांत पुन्हा एकदा विक्रमी रुग्णांची नोंद

देशातील कोरोनाबाधितांची संख्या 23 लाख पार, 24 तासांत पुन्हा एकदा विक्रमी रुग्णांची नोंद

आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार देशातील एकूण रुग्णांची संख्या आता 23 लाख पार झाली आहे. यात 6 लाख 43 हजार 948 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

  • Published by:  Priyanka Gawde
नवी दिल्ली, 12 ऑगस्ट : गेल्या काही दिवसांपासून देशात एका दिवसात 60 हजारहून अधिक रुग्ण सापडत आहे. गेल्या 24 तासातही 60 हजार 963 रुग्ण सापडले. तर, आतापर्यंत 704 जणांचा मृत्यू झाला. यासह देशातील एकूण रुग्णांची संख्या आता 23 लाख 29 हजार 639 झाली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार देशातील एकूण रुग्णांची संख्या आता 23 लाख पार झाली आहे. यात 6 लाख 43 हजार 948 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर, आतापर्यंत 46 हजार 91 रुग्णांचा मृत्यू झाला. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 16 लाख 39 हजार 599 रुग्ण निरोगीही झाले आहे. यासह भारताचा रिकव्हरी रेट 70% झाला आहे. वाचा-रशियानंतर आता आणखी एका देशानं तयार केली Corona Vaccine, लवकरच करणार घोषणा वाचा-20 देशांकडून ऑर्डर; भारतातही दिली जाणार का रशियन लस? AIIMS ने दिली माहिती महाराष्ट्राची आकडेवारी राज्यात मंगळवारी पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली. एका दिवसात तब्बल अकरा हजार 88 नवीन रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या ही 5 लाख 35 हजार 601 एवढी झाली आहे. तर दिवसभरात 256 रुग्णांचा मृत्यू झालाय. राज्यातील मृत्युदर 3.42 टक्के इतका आहे. राज्यात आज 10 हजार 14 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. राज्यात आजपर्यंत तीन लाख 68 हजार 435 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 68.79 टक्के एवढं झालं आहे. राज्यांची आकडेवारी वाचा-102 दिवसांनी न्यूझीलँडमध्ये कोरोनाची पुन्हा एंट्री; लोकल ट्रान्समिशनमुळे चिंता दरम्यान, भारतात सलग आठव्या दिवशी 24 तासांत अमेरिका आणि ब्राझीलपेक्षा अधिक रुग्ण सापडले आहे. अमेरिकेत गेल्या 24 तासांत 54.5 हजार नवीन रुग्ण सापडले तर ब्राझीलमध्ये 54.9 हजार.
First published:

Tags: Corona, Corona virus in india

पुढील बातम्या