नवी दिल्ली, 03 ऑगस्ट: देशातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी, निरोगी रुग्णांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढत होत आहे. गेल्या 24 तासांत 52 हजार 972 रुग्णांची नोंद झाली तर, 771 रुग्णांचा मृत्यू झाला. सलग दुसऱ्या दिवशी एकाच दिवसात 50 हजारहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. यासह देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 18 लाख 03 हजार 696 झाली आहे. यातील 5 लाख 79 हजार 357 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. तर 38 हजार 135 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.
या सगळ्या दिलासादायक बाब म्हणजे देशात तब्बल 2 कोटी लोकांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. रविवारी एकाच दिवसात 3.18 लाख लोकांचा चाचण्या करण्यात आल्या. तर, देशात एकाच दिवसात जवळजवळ 41 हजार रुग्ण निरोगी झाले आहे. यासह एकूण निरोगी रुग्णांची संख्या आता 11 लाख 86 हजार झाली आहे. यासह देशाचा रिकव्हरी रेट 65.8% झाला आहे.
Single-day spike of 52,972 positive cases & 771 deaths in India in the last 24 hours.
— ANI (@ANI) August 3, 2020
India's COVID19 tally rises to 18,03,696 including 5,79,357active cases, 1,186,203 cured/discharged/migrated & 38,135 deaths: Health Ministry pic.twitter.com/OKfjsgwyC9
महाराष्ट्रात रविवारी 9509 नवीन कोरोना रुग्ण सापडले. यासह राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 4 लाख 41 हजार 228 झाली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 24 तासांत 260 रुग्णांचा मृत्यू झाला होता. आतापर्यंत 15 हजार 576 रुग्णांचा राज्यात मृत्यू झाला आहे. मात्र रविवारी नवीन रुग्णांपेक्षा निरोगी रुग्णांची संख्या सर्वात जास्त होती. एकाच दिवसात राज्यातील 9,926 रुग्णांचा डिस्चार्ज देण्यात आला. त्याचबरोबर दिल्लीतील रिकव्हरी रेटही 89.6% झाला आहे.
लवकरच मिळणार मेड इन इंडिया लस
भारतासह जगभरातील सर्व कंपनी प्रयत्न करत आहे. यासाठी दिवसरात्र ट्रायल्स केले जात आहेत. काही लशीच्या चाचण्या अंतिम टप्प्यात आहेत तर काही पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात. भारतात जी कंपनी लस तयार करत आहे त्याचे नाव आहे सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया (Serum Insititite of India). दरम्यान सीरम कंपनीला DCGI कडून दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याच्या क्लिनिकल ट्रायलची परवानगी मिळाली आहे. ही लस ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि एस्ट्रा जेनेका कोव्हिड-19 लस यांच्यासोबत ही सीरम लस तयार करणार आहे. या लसीचे नाव COVISHIELD (कोव्हिशिल्ड) असणार आहे. रम इंस्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अदार पूनावाला यांनी ही लस मोठ्या प्रमाणात भारतात तयार केली जाणार असल्याचा दावा केला आहे.मीडिया रिपोर्टनुसार, ही लस प्रति मिनिटांत 500 वॅक्सिन डोस तयार करणार आहे.