News18 Lokmat

गायक मिका सिंग दुबई पोलिसांच्या ताब्यात, लैंगिक गैरवर्तनाचा आरोप

वादग्रस्त वक्तव्य, मुलींसोबत लगट करणं, मद्यप्राशन करून धिंगाना घालण्याचे आरोप त्याच्यावर सातत्याने होत असतात.

News18 Lokmat | Updated On: Dec 6, 2018 10:40 PM IST

गायक मिका सिंग दुबई पोलिसांच्या ताब्यात, लैंगिक गैरवर्तनाचा आरोप

दुबई, 6 डिसेंबर : कायम वादात राहणारा गायक मिका सिंग याला दुबई पोलिसांनी ताब्यात घेतलंय. मिका विरूद्ध लैंगिक गैरवर्तणुकीची तक्रार एका तरूणीने केली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. मिका त्याच्या गाण्यांच्या कार्यक्रमांसाठी दुबई दौऱ्यावर होता. त्याला ताब्यात घेतल्याच्या वृत्ताला मिकाच्या टिममधल्या सदस्यांनीही दुजोरा दिलाय.


मिका सिंग याने एका 17 वर्षांच्या ब्राझिलीयन मुलीला अश्लील फोटो दाखवला आणि मेसेजही केला असल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. पोलिसांनी तातडीने त्या तक्रारीची दखल घेतली आणि मिकाला ताब्यात घेतलं. दुबई पोलीस त्याची चौकशी करत आहेत.


मिका हा आपल्या वागण्यामुळं कायम वादात असतो. एका कार्यक्रमात त्याने अभिनेत्री राखी सावंत हिचं जबरदस्तीने चुंबन घेतल्याचं प्रकरण चांगलच गाजलं होतं. त्यानंतर त्याने राखीची माफीही मागीतली होती. तर राखीने त्याच्याविरूद्ध आवाज उठवला होता.

Loading...


त्यानंतरही तो पंजाबमध्ये काही घटनांमध्ये वादात सापडला होता. वादग्रस्त वक्तव्य, मुलींसोबत लगट करणं, मद्यप्राशन करून धिंगाना घालण्याचे आरोप त्याच्यावर सातत्याने होत असतात. मिकासिंग हा प्रसिद्ध गायक दलेर मेहेंदी यांचा छोटा भाऊ आहे.

 

VIDEO : ...म्हणून सोशल मीडियावर शेअर होतायत स्लीव्हलेस फोटोबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 6, 2018 10:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...