S M L

मानवी तस्करी प्रकरणी दलेर मेहेंदी दोषी, दोन वर्षांची शिक्षा

पंजाबच्या पातियाळा कोर्टाने प्रसिद्ध गायक दिलेर मेहेंदील मानवी तस्करी प्रकरणी दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावलीय. या प्रकरणात दलेरचा भाऊ समशेर सिंह यालाही दोषी ठरवलय.

Ajay Kautikwar | Updated On: Mar 16, 2018 02:41 PM IST

मानवी तस्करी प्रकरणी दलेर मेहेंदी दोषी, दोन वर्षांची शिक्षा

पतियाळा,16 मार्च : पंजाबच्या पातियाळा कोर्टाने प्रसिद्ध गायक दिलेर मेहेंदील मानवी तस्करी प्रकरणी दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावलीय. या प्रकरणात दलेरचा भाऊ समशेर सिंह यालाही दोषी ठरवलय. काही लोकांना बेकायदेशीररित्या विदेशात पाठवल्याचा आरोप दलेर आणि त्याचा भावावर होता. न्यायालयाच्या निकालानंतर पोलिसांनी दलेर आणि त्याच्या भावाला अटक केलीय.

दलेर आणि त्याच्या भावाने 1998 आणि 1999 मध्ये अमेरिकेत दोन वेळा स्टेज शो कार्यक्रम केले होते. यासाठी ते जे टीम घेऊन अमेरिकेत गेले होते त्यातल्या 10 जणांना त्यांनी तिथेच ठेवले असा आरोप आहे. यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर पैसे घेतल्याचही सिद्ध झालंय. अभिनेते आणि अभिनेत्रींना घेऊन दौरे करायचे आणि त्यासाठीच्या टीम मध्ये विदेशात जाण्यासाठी इच्छुक लोकांना घेऊन त्यांना तिथेच सोडायचे अशी मोड्स ऑपरेंडी होती असं न्यायालयात सांगण्यात आलंय. दलेर मेहेंदी सारख्या प्रसिद्ध गायक अशा कृत्यात सहभागी झाल्याचं सिद्ध झाल्यानं त्याच्या चाहत्यांना प्रचंड धक्का बसलाय. तर यामागे मोठं रॅकेट असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 16, 2018 02:41 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close