'कोरियन ओपन'मध्ये सिंधूची अंतिम फेरीत धडक

'कोरियन ओपन'मध्ये सिंधूची अंतिम फेरीत धडक

भारताची अव्वल महिला बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने कोरियन ओपन सुपर सिरीजच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. उपांत्यफेरीच्या सामन्यात सिंधूने चीनच्या ही बिंगजिओचा 21-10, 17-21, 21-16 असा सरळ तीन सेटमध्ये पराभव केला आहे. अंतिम फेरीत जपानच्या नोझोमी ओकुहाराशी सिंधूचा सामना होणार आहे.

  • Share this:

सेऊल, 16 सप्टेंबर : भारताची अव्वल महिला बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने कोरियन ओपन सुपर सिरीजच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. उपांत्यफेरीच्या सामन्यात सिंधूने चीनच्या ही बिंगजिओचा 21-10, 17-21, 21-16 असा सरळ तीन सेटमध्ये पराभव केला आहे. अंतिम फेरीत जपानच्या नोझोमी ओकुहाराशी सिंधूचा सामना होणार आहे.

आजचा उपांत्य फेरीचा सामना जिंकण्यासाठी सिंधूला 63 मिनिटे लागली. पहिल्या सेटमध्ये सुरुवातीला सिंधूने 5-2 अशी आघाडी घेतली. मितानीने तिची आघाडी कमी करत पहिला सेट 8-6 असा केला. सामन्यात मिड इंटरव्हलसाठी थांबला तेव्हा मितानी 11-9 अशी आघाडीवर होती. सिंधूने त्यानंतर हा सेट 13-13 असा बरोबरीत आणला. दोन्ही खेळाडू 19-19 अश्या बरोबरीत आल्यावर सिंधूने आपला खेळ उंचावत पहिला सेट 21-19 असा जिंकला.

दुसऱ्या सेटमध्ये मितानी हिने उत्तम प्रदर्शन करताना 5-1 अशी आघाडी सिंधूने सलग गुण मिळवत तिची आघाडी 5-4 अशी केली. दुसऱ्या सेटमध्ये दोन्ही खेळाडू 8-8 अश्या बरोबरीत होत्या. त्यानंतर मितानीने सेटवर वर्चस्व गाजवत दुसरा सेट 21-16 असा जिंकत सामन्यात 1-1 अशी बरोबरी केली. तिसऱ्या आणि निर्णायक तिसऱ्या सेटमध्ये सिंधूनं आपला खेळ पहिल्यापासूनच उंचावला. या सेटमध्ये सुरुवातीला सिंधूने 6-2 अशी आघाडी मिळवली. शेवटचा सेट सिंधूने 21-10 असा जिंकत सामना आपल्या नावे केला.

महिला एकेरीत सिंधूने शानदार खेळाचे प्रदर्शन करताना जागतिक क्रमवारीत 17 व्या स्थानी असलेल्या हाँगकाँगच्या चेउंग नगान हिला सरळ दोन गेममध्ये 21-13, 21-8 असा पराभव केला होता. ऑलिम्पिक रौप्य विजेती सिंधूने थायलंडची नितचाओन जिदापोलवर २२-२०, २१-१७ अशा फरकाने विजय नोंदविला. आता अंतिम फेरीत सिंधू कसा खेळ करतेय याकडे सर्वांचेच लक्षं लागलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 16, 2017 01:53 PM IST

ताज्या बातम्या