Home /News /national /

ऑनलाईन शिक्षणासाठी मुलांना चढावा लागतो दोन किलोमीटर डोंगर, मग मिळते मोबाईलला रेंज

ऑनलाईन शिक्षणासाठी मुलांना चढावा लागतो दोन किलोमीटर डोंगर, मग मिळते मोबाईलला रेंज

ऑनलाईन शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना दोन किलोमीटर डोंगर चढून वरती दररोज जावं लागतं. डोंगरावर गेल्यावर त्यांना मोबाईलची रेंज (Mobile Network) मिळते आणि मग तिथेच बसून त्यांचा अभ्यास सुरू होतो.

    नैनिताल 17 जून : सध्या कोरोनाविषाणूच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर देशात अनेक ठिकाणी लॉकडाऊनची स्थिती आहे. मुलांच्या शाळा बंद असल्यानं सर्व शिक्षण ऑनलाइन पद्धतीनं (Online Education) घ्यावं लागत आहे. मात्र, यामध्ये विद्यार्थ्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे काही घटनांवरून दिसून येत आहे. ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी एकेठिकाणी विद्यार्थ्यांना दोन किलोमीटर डोंगर चढून वरती दररोज जावं लागतं. डोंगरावर गेल्यावर त्यांना मोबाईलची रेंज (Mobile Network) मिळते आणि मग तिथेच बसून त्यांचा अभ्यास सुरू होतो. मोबाईलला नेटवर्कच मिळत नसल्यानं अभ्यास करण्यासाठी मुलांना दररोज 10 ते 2 या वेळेत डोंगरावर जाऊन नेटवर्क मिळेल अशा ठिकाणी अभ्यासासाठी बसावे लागते. शिक्षणासाठी मुलांना करावा लागणारा हा उपद्व्याप हिमाचल प्रदेशमधील नैनिताल येथील आहे. नैनीताल जिल्ह्यातील बटालघाट ग्रामसभेतील मल्यागाव आणि सौगाव यासारख्या जवळपासच्या अनेक गावांमधील मुलांना मोबाईल नेटवर्कमुळे ऑनलाइन वर्गांसाठी दररोज दोन किलोमीटरपर्यंत जावे लागते. बेतालघाट येथील खासगी शाळेत शिकणारी वर्ग तीनची विद्यार्थिनी लक्ष्मी बोरा आणि साक्षी बोरा यांनी सांगितले की, खेड्यातील मोबाईल नेटवर्क अतिशय कमी वेगात चालत असल्यामुळं त्यांना अभ्यासामध्ये अडचणी येत आहेत. पावसाळ्यात तर मोबाइल नेटवर्क मुळीच येत नसल्याची मुलींची तक्रार आहे.  त्यांच्यासह बऱ्यचा मुल-मुलींना दररोज शिक्षणासाठी दोन किलोमीटरचा डोंगर चढावा लागतो. शाळेतील मुले म्हणाली की शाळा सुरू होत नाही तोपर्यंत त्यांना ऑनलाईन अभ्यास करण्यासाठी आम्हाला असे रोज जावे लागणार आहे. गावात फक्त बीएसएनएल 2 जी नेटवर्क  मुलांना डोंगरावर नेवून जंगलामध्ये त्यांना शिक्षणासाठी मदत करणारे नंदन सिंह म्हणतात की, खेड्यातील सरकारी बीएसएनएल मोबाईल टॉवरला फक्त 2 जी वेगात इंटरनेट मिळते, तर दुसरा खासगी मोबाइल टॉवर जिओ (jio) अलिकडे बसविला आहे. त्याचे नेटवर्क गावात येत नाही. नेटवर्क नसल्यामुळे मुलांना अभ्यासामध्ये अडचणी येत आहेत. त्याचबरोबर, गावातील मोबाइल नेटवर्कची समस्या अनेक वर्षांपासून कायम आहे. हे वाचा - मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी नंदीग्राम निकालाला उच्च न्यायालयात दिलं आव्हान, उद्या सुनावणी मोबाईल इंटरनेट नेटवर्कसाठी गावातील अनेकांनी सरकारी अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र, या विषयावर विशेष कोणतेही काम झालेले नाही.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Education, School children

    पुढील बातम्या