Home /News /national /

कोरोनाच्या लढाईत शीख तरुणांचा मोलाचा वाटा, वॉरियर्सना रोज खायला देतात पिझ्झा

कोरोनाच्या लढाईत शीख तरुणांचा मोलाचा वाटा, वॉरियर्सना रोज खायला देतात पिझ्झा

पिझ्झ्यामागची गोष्ट! कोरोना वॉरियर्सचं धैर्य वाढवण्यासाठी शीख तरुणाचं लयं भारी काम

    मुंबई, 21 मे : कोरोनाच्या महासंकटात आरोग्य सेवेचे कर्मचारी, पोलीस आणि अनेक वॉरियर्स आपला जीव धोक्यात घालून नागरिकांची मदत करत आहेत. या सगळ्यांचं जगभरात वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांच्या कर्तव्याला सॅल्युट केला जात आहे. शीख तरुणांना यांना वेगळ्या पद्धतीनं सलाम करत त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. शीख तरुणांनी मिळून 16-16 तास काम करणाऱ्या कोरोना वॉरियर्सना पिझ्झा खायला घालण्याचं काम सुरू केलं आहे. इंडिया टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार डेट्रायड इथे शैलेंद्र सिंह हे कोरोनाचं महासंकट येण्याआधी गुरुद्वारात 300 लोकांना पिझ्झा खाऊ घालत होते. मात्र लॉकडाऊनमुळे गुरुद्वार बंद आहे. त्यामुळे कोरोना विरुद्धच्या लढाईत जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या वॉरियर्सना आणि त्यांच्या कुटुंबीयांना पिझ्झा खायला देत आहेत. या लढाईत आपल्यासाठी कर्तव्य बजावणारे कुणीही उपाशी राहू नये आणि उपाशी पोटी काम करू नये एवढाच त्यांचा यामागचा उद्देश आहे. हे वाचा-...तर पुन्हा सुरू होऊ शकतं सिनेमांचं शूटिंग, CM उद्धव ठाकरेंनी दिले संकेत अब लॉकडाऊननंतर गुरुद्वार बंद असल्यामुळे सिंह कुटुंबीयांनी आपापसात चर्चा केली. आपण या कोरोना वॉरियर्ससाठी काहीतरी केली पाहिजे. अर्जुन और बानी यांनी या दोघांनी एप्रिल महिन्यात तब्बल 1 हजारहून अधिक पिझ्झा वाटले आहेत. जिथे खाण्या-पिण्याचे वांदे आहेत अशा ठिकाणी कोरोना वॉरिर्यसाठी पिझ्झा खायला पोहोचवतो. संपादन- क्रांती कानेटकर हे वाचा-हेल्मेट ओळखणार कोरोनाची लक्षण, जाणून घ्या काय आहे खास हे वाचा-अम्फाननंतर पावसाचा फटका; एअरपोर्टचं झालं तलाव, पाण्यात बुडाली विमानं
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Coronavirus, Coronavirus symptoms

    पुढील बातम्या