मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही नवज्योत सिंग सिद्धू शहीद जवानाच्या अंत्यसंस्काराला गैरहजर

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही  नवज्योत सिंग सिद्धू शहीद जवानाच्या अंत्यसंस्काराला गैरहजर

नवज्योत सिंग सिद्धू यांनी दहशतवादाचं समर्थन होऊ शकत नाही. पण, त्याकरता एखाद्या धर्माला आणि देशाला जबाबदार धरता येणार नाही, असं विधान केलं होतं.

  • Share this:

चंडीगड, 16 फेब्रुवारी : पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या आदेशानंतर देखील माजी क्रिकेटर आणि पंजाबचे कॅबिनेट मंत्री नवज्योत सिंग सिंद्धू शहीद जवानाच्या अंत्यविधीला गैरहजर राहिले. गुरुवारी पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये पंजाबमधील 4 जवानांना वीरमरण आलं. आज त्याचं पार्थिव त्यांच्या मुळगावी आणण्यात आलं. या जवानांच्या अंत्यसंस्कारला कोणत्या मंत्र्यांनी हजर राहायचे याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी दिली होती. नवज्योत सिंग सिद्धू यांच्याकडे शहीद जवान जयमल सिंह यांच्या अंत्यसंस्काराला हजर राहण्याची जबाबदारी होती. यासंदर्भात पोलिसांना देखील कळवण्यात आलं होतं.

पण, जयमल यांच्या अंत्यसंस्काराला हजर न राहता सिंद्धू हे लुधियानामध्ये होते. यावेळी त्यांनी काही कामांचे आदेश देखील काढले. ज्यावेळी पत्रकारांनी त्यांना याबद्दल विचारले असता, तेव्हा त्यांनी आपल्या विधानाला चुकीच्या पद्धतीनं दाखवण्यात आल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, सिद्धू यांच्या विधानानंतर त्यांची सोनी टीव्हीनं देखील 'द कपिल शर्मा शो'मधून त्यांची हकालपट्टी केली आहे.

''दहशतवादासाठी पाकिस्तानला कसं जबाबदार धरणार?"

पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात देशात प्रचंड रोष पाहायाला मिळत आहे. गुरूवारी झालेल्या या हल्ल्यामध्ये 40 जवान शहीद झाले. यावर बोलताना नवज्योत सिंग सिद्धू यांनी दहशतवादाचं समर्थन होऊ शकत नाही. पण, त्याकरता एखाद्या धर्माला आणि देशाला जबाबदार धरता येणार नाही, असं विधान केलं होतं. त्यानंतर सिद्धू यांच्याविरोधात प्रचंड प्रमाणात रोष पाहायाला मिळत आहे.

सोनी टीव्हीनं केली हकालपट्टी

पुलवामा इथं दहशतवादी हल्ल्यानंतर नवज्योत सिंग सिद्धू यांनी जे वक्तव्य केलं, त्याचा सगळीकडून निषेध होत होता. कपिल शर्मा शोमध्ये सिद्धूची मोठी भूमिका असते. हा शो एकतर बंद करावा किंवा त्यातून सिद्धू यांना काढून टाकावं अशी जोरदार मागणी सुरू होती. जनतेच्या या रोषामुळे सोनीनं सिद्धू यांना द कपिल शर्मा शोमधून काढण्याचा निर्णय घेतलाय. सिद्धूच्या जागी आता अभिनेत्री अर्चना पुरण सिंगला घेतले आहे. लोकांनी सिद्धू यांना कपिल शर्माच्या शोमधून काढून टाकावं, नाही तर आम्ही शोवर बंदी घालू अशी मागणी केली होती. ट्विटरवर #Boycotthe kapil Sharma show हा हॅशटॅग ट्रेंड झाला होता.

VIDEO : पुलवामा हल्ल्यानंतर काय आहे काश्मिरी नागरिकाच्या मनात?


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 16, 2019 07:17 PM IST

ताज्या बातम्या