मराठी बातम्या /बातम्या /देश /

VIDEO : जीव वाचावा म्हणून मुसेवालानं दिली होती 2 कोटींची ऑफर, हत्येच्या मास्टरमाईंडचा खुलासा

VIDEO : जीव वाचावा म्हणून मुसेवालानं दिली होती 2 कोटींची ऑफर, हत्येच्या मास्टरमाईंडचा खुलासा

पंजाबी गायक सिद्धू मुसेवालानं (Sidhu Musewala) स्वत:चा जीव वाचावा म्हणून 2 कोटींची ऑफर दिली होती, असा खुलासा त्याच्या हत्येच्या मास्टरमाईंडनं केला आहे.

    मुंबई, 15 जुलै : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्येचा (Sidhu Musewala Murder) मास्टरमाईंड गोल्डी बरारनं News18 शी बोलताना मोठा खुलासा केला आहे. बरार सध्या कॅनडामध्ये आहे. मुसेवालनं स्वत:चा जीव वाचवण्यासाठी 2 कोटींची ऑफर दिली होती, असा दावा बरारनं केला आहे. बरारनं या व्हिडीओमध्ये बुरखा घातलाय. पण, हा त्याचाच आवाज असल्याची पृष्टी पंजाब आणि दिल्ली पोलिसांनी केली आहे. काय होती ऑफर? बरारच्या दाव्यानुसार 'निवडणुकांच्या दरम्यान मुसेवालाच्या काही लोकांनी त्याला सोडण्याची विनंती केली होती. तुम्हाला 2 कोटी मिळतील. त्यानंतर तुम्हाला  गुरूद्वारा साहिबमध्ये जाऊन सिद्धू मुसेवालाला काही करणार नाही, अशी शपथ घ्यावी लागेल. आपल्याला कोणतीही तडजोड करायती नव्हती. त्यामुळे आपण हा प्रस्ताव फेटाळला,' असं बरारानं सांगितलं. या व्हिडीओ खरा असल्याचं कोणतंही प्रमाणपत्र News18 देत नाही. कारण, व्हिडीओची सत्यता पडताळणे हे सुरक्षा एजन्सींचे काम आहे. बरारनं या व्हिडीओमध्ये मुसेवालाच्या हत्येची संपूर्ण जबाबदारी घेतली आहे. 'आमच्या दोन भावांच्या हत्येमध्ये मुसेवालाचा कोणत्या ना कोणत्या प्रकारे सहभाग होता. त्यामुळे आम्ही हा बदला घेतला आहे. आम्हाला याचा कोणताही पश्चाताप नाही,' असा दावा बरारनं केला आहे. पत्नीनं मंगळसूत्र काढलं म्हणून पतीला मिळाला घटस्फोट, उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय सिद्धू मुसेवालाला हत्येनंतर शहीद योद्धाचा दर्जा दिला जात आहे. पण, तो जिवंत होता त्यावेळी 95 टक्के लोकं त्याला वाईट म्हणतं असतं. आम्ही त्याला मारणार आहोत हे सिद्धूनला माहिती होते. आम्ही देखील त्याला सांगून त्याची हत्या केली आहे. आम्हाला बदला घ्यायचा होता. तो बदला आम्ही घेतला आहे,' असे बरारनं म्हंटले आहे.
    Published by:Onkar Danke
    First published:

    Tags: Murder, Punjab, Video

    पुढील बातम्या