मोदींबद्दल काय म्हणाले सिद्धू ? थेट साधला निशाणा

दहशतवादाबद्दल केलेल्या एका वक्तव्यावरून नवज्योतसिंग सिद्धू यांना लक्ष्य करण्यात आलं होतं. एवढी टीका झाल्यानंतर सिद्धू यांनी बरेच दिवस मौन पाळलं पण आता मात्र त्यांनी एक ट्वीट करून भाजपला लक्ष्य केलं आहे. यात त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांना सवाल विचारला आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 3, 2019 02:58 PM IST

मोदींबद्दल काय म्हणाले सिद्धू ? थेट साधला निशाणा

नवी दिल्ली, ३ एप्रिल :

दहशतवादाबद्दल केलेल्या एका वक्तव्यावरून नवज्योतसिंग सिद्धू यांना लक्ष्य करण्यात आलं होतं. एवढी टीका झाल्यानंतर सिद्धू यांनी बरेच दिवस मौन पाळलं पण आता मात्र त्यांनी एक ट्वीट करून भाजपला लक्ष्य केलं आहे. यात त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांना सवाल विचारला आहे.सिद्धू यांनी या ट्वीटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राजनाथ सिंह यांच्या एका व्हिडिओचाही दाखला दिला आहे. दहशतवादाला कोणतीही जात किंवा धर्म नसतो, असं या नेत्यांनी या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं.

Loading...

या व्हिडिओचा दाखला देऊन नवज्योतसिंग सिद्धू यांनी भाजपवर जोरदार टीका केली.

सिद्धू यांनी भाजपवर टीका केली असली तरी काँग्रेसमध्येही त्यांच्याबाबतीत फारसं काही आलबेल नाही. पक्षाने चंदीगड लोकसभा मतदारसंघातून पत्नी नवजोत कौर यांना उमेदवारी न दिल्याने सिद्धू नाराज झाले आहेत.याआधी, 2014मध्ये अमृतसरमधून जेटलींना उमेदवारी दिल्याने सिदधू भाजपवरही नाराज झाले होते.

पंजाबमधल्या विधानसभा निवडणुकीत ते काँग्रेसमध्ये गेले. पण आता तिथेही काँग्रेस नेत्यांशी त्यांचे वाद होत आहेत.

सिद्धू यांनी भाजप नेत्यांबद्दल केलेल्या या ट्वीटवर आता काय प्रतिक्रिया उमटते ते पाहावं लागेल.

=======================================================================================================================================================

17 सेकंदात 27 वेळा कमळ.. कमळ.. कमळ..! भाजप नेत्याचा VIDEO VIRAL


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 3, 2019 02:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...