Elec-widget

सिद्धू राजकारण सोडा, मोहालीत लागले पोस्टर्स

सिद्धू राजकारण सोडा, मोहालीत लागले पोस्टर्स

सिद्धू वादात सापडण्याचं कारण हे त्यांचं आणि मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांच्यातलं भांडण नाही तर त्यांच्याविरुद्ध मोहालीत लागलेले पोस्टर्स आहेत.

  • Share this:

मोहाली, 21 जून :  काँग्रेसचे पंजाबमधले मंत्री नवज्योतसिंग सिद्धू कायम चर्चेत असतात. सध्या ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळेचं कारण हे त्यांचं आणि मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांच्यातलं भांडण नाही तर त्यांच्याविरुद्ध मोहालीत लागलेले पोस्टर्स आहेत. यावेळी ते राहुल गांधींबद्दलच्या वक्तव्यावरून अडचणीत आले आहेत. राहुल गांधी हरले तर मी राजकारणातून संन्यास घेईन, असं सिद्धू म्हणाले होते. आता राहुल गांधींचा अमेठीतून पराभव झाल्यानंतर, सिद्धू संन्यास कधी घेणार? राजकारण कधी सोडणार? असा प्रश्न त्यांना विचारला जातोय. सोशल मीडियावर त्यांना अनेकांनी यावरून ट्रोल केलं आहे.

मोहालीत त्याबद्दलचे पोस्टर्स लागले आहेत. सिद्धू तुम्ही राजकारण कधी सोडणार असा सवाल त्यांना करण्यात आलाय. या पोस्टर्सनंतर राज्यातलं सिद्धूविरोधातलं राजकारण आणखी तापणार आहे. मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांचं आणि सिद्धू यांचं अजिबात पटत नाही. नुकत्याच मंत्रिमंडळात केलेल्या फेरबदलात अमरिंदरसिंग यांनी सिद्धूला बिनमहत्त्वाचं खातं दिलं होतं.

अमरिंदरसिंग यांच्यावर टीका

नवज्योतसिंग सिद्धू यांनी पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्यावरही टीका केली होती. आपल्या पत्नीला उमेदवारी न दिल्यामुळे सिद्धू नाराज होते. आपल्याच पक्षाच्या दिग्गज नेत्यावर टीका केल्यामुळे सोशल मीडियावरही सिद्धू ट्रोल होत राहिले.

काय होतं वक्तव्य?

Loading...

राहुल गांधी अमेठीतून हरले तर मी राजकारणातून संन्यास घेईन, असं ते लोकसभा निवडणुकीतल्या प्रचारादरम्यान महिन्यात म्हणाले. आता राहुल गांधी हरले तर सिद्धू काय करणार, असं लोक विचारत आहेत. सरदार आपल्या वक्तव्यावरून मागे हटत नाही, असं म्हणतात. मग सिद्धू आपल्या वक्तव्यावरून मागे का हटले, याचीही आठवण काहींनी करून दिली. आता सिद्धू या सगळ्या टिकेला काय उत्तर देणार याबद्दल सगळ्यांना उत्सुकता आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर वादग्रस्त वक्तव्य

पुलवामा हल्ल्यानंतर नवज्योतसिंग सिद्धू यांनी जवानांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती. यानंतर त्यांना कपिल शर्मा शो मधून काढून टाकण्यात आलं होतं. त्यांच्या जागी आता अर्चना पूरणसिंग या शो मध्ये आल्या.

नवज्योतसिंग आणि कॅप्टन अमरिंदर सिंग यांचं पहिल्यापासूनच फारसं पटलं नाही. मात्र राहुल आणि प्रियंका गांधी यांच्याशी असलेली जवळीक आणि लाभलेलं वलय यामुळे सिद्धू यांची मंत्रीपदावर वर्णी लागली होती. निवडणुकीच्या प्रचारात नवजोत कौर यांनी कॅप्टन अमरिंदर सिंगांनीच आपलं निवडणुकीचं तिकिट कापलं असा आरोप केला होता.

सिद्धूनेही कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यावर टीका केली होती. या टीकेने भडकलेल्या अमरिंदर सिंग यांनी सिद्धूला मुख्यमंत्रीपद हवं आहे आणि त्यासाठीच तो वाट्टेल ती टीका करत असल्याचा आरोप केला होता. सिंग यांच्या या टीकेमुळे परिस्थिती आणखीच बिघडली. पक्षश्रेष्ठींनी सिद्धूवर शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 21, 2019 04:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...