मोदी खोटं बोलतात,सिद्धरामय्यांनी ठोकला 100 कोटींचा मानहानीचा दावा

मोदी खोटं बोलतात,सिद्धरामय्यांनी ठोकला 100 कोटींचा मानहानीचा दावा

सिद्धरामय्या यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्वच नेत्यांनी सोशल मीडिया, टीव्हीच्या माध्यमातून जाहीर माफी मागावी अशी मागणीही त्यांनी केली.

  • Share this:

कर्नाटक, 07 मे : कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा, आणि येडियुप्पा याच्या विरोधात 100 कोटींचा  मानहानीचा दावा ठोकलाय. याबद्दल त्यांनी कायदेशीर नोटीसही पाठवली आहे. मोदी,अमित शहा आणि येडियुरप्पा हे जाणिवपूर्वक बदनामीकारक खोटी विधानं करत असल्याचा आरोप  सिध्दरामय्यांनी केलाय.

सिद्धरामय्या यांनी आपल्या नोटिसीमध्ये पंतप्रधान मोदींनी केलेल्या '10 टक्के सरकार' टीकेचा उल्लेख केलाय. मोदी म्हणाले होते की, "सरकार कोणतेही काम करते त्यात 10 टक्के कमिशन घेते." यासह कर्नाटक सरकार हे 'ईज आॅफ डुइंग मर्डर्स' असा आरोपही मोदींनी केला होता.

सिद्धरामय्या यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्वच नेत्यांनी सोशल मीडिया, टीव्हीच्या माध्यमातून जाहीर माफी मागावी अशी मागणीही त्यांनी केली. जर तुम्ही माफी मागितली नाहीतर 100 कोटींच्या खटल्यासाठी तयार राहा असा इशाराही त्यांनी दिला.

First published: May 7, 2018, 6:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading