मराठी बातम्या /बातम्या /देश /

कुटुंब हैराण! प्रेमात वेडे झाले भाऊ-बहीण; मंदिरात लग्न करून एकमेकांसोबतच थाटला संसार

कुटुंब हैराण! प्रेमात वेडे झाले भाऊ-बहीण; मंदिरात लग्न करून एकमेकांसोबतच थाटला संसार

धक्कादायक बाब म्हणजे ही तरुणी 4 महिन्यांची गर्भवती आहे.

धक्कादायक बाब म्हणजे ही तरुणी 4 महिन्यांची गर्भवती आहे.

धक्कादायक बाब म्हणजे ही तरुणी 4 महिन्यांची गर्भवती आहे.

  • Published by:  Meenal Gangurde

पाटना, 23 डिसेंबर : बिहारमधील (Bihar) वैशाली येथे (Vaishali) एक विचित्र प्रकार समोर आला आहे. येथे चुलत भाऊ-बहिणींना मंदिरात एकमेकांसोबत (Cousins ​​and Sister Married) लग्न केल्याचं वृत्त समोर आलं आहे. या घटनेचा एक व्हिडीओ जलद गतीने व्हायरल होत आहे. ही घटना भगवानपूर प्रखंड येथील एका गावातील आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण आणि तरुणी गावातील मंदिरात लग्न करीत असल्याचं दिसत आहे. धक्कादायक म्हणजे तरुणी 4 महिन्यांची गर्भवती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भाऊ-बहिणीमध्ये गेल्या 3 वर्षांपासून प्रेम प्रकरण सुरू होतं. यांच्या लग्नाबद्दल कळताच त्यांच्या घरासमोर गावकरी जमा झाले. लग्नानंतर दोन्ही कुटुंबामध्ये तणावाचं वातावरण आहे. आता मुलीचं कुटुंब या लग्नाला परवानगी देणार की नाही याबाबत नेमकी माहिती मिळालेली नाही. दोघांची घरंही जवळपास आहेत. आणि नात्यात दोघेही चुलत भाऊ-बहिण आहेत. बुधवारी सोशल मीडियावर दोघांच्या लग्नाचा व्हिडीओ व्हायरल झाला.

हे ही वाचा-Vaccine घेऊन आलेल्या B Tech च्या विद्यार्थ्यानं स्वतःवर गोळी झाडून संपवलं जीवन

बहिणीसोबत केलं लग्न..

व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुण हातात सिंदूर घेऊन बहिणीच्या भांगेत भरताना दिसत आहे. यानंतर खिशातून मंगळसूत्र काढतो आणि मुलीच्या गळ्यात घालतो. हे सर्व विधी करताना तरुणाने व्हिडीओ केला असून तो स्वत:च व्हायरल केला आहे. गावकऱ्यांना कळताच त्यांच्या घऱाबाहेर गर्दी जमा झाली. आपल्या चुलत बहिणीसोबत लग्न केल्यामुळे गावात मोठी चर्चा सुरू झाली. शेवटी मात्र तरुण-तरुणीच्या लग्नानंतर दोघांचेही कुटुंबीने लग्नाला होकार दिला आहे.

First published:

Tags: Bihar, Marriage