कपिल सिब्बल यांना गुजरात प्रचारापासून लांब राहायचे आदेश

कपिल सिब्बल यांना गुजरात प्रचारापासून लांब राहायचे आदेश

गुजरात प्रचारापासून लांब रहा, असे आदेश सिब्बल यांना पक्षश्रेष्ठींकडून मिळाले आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे .

  • Share this:

07 डिसेंबर:  काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांना राम मंदिरावरून झालेला वाद चांगलाच महागात पडलाय. गुजरात प्रचारापासून लांब रहा, असे आदेश सिब्बल यांना पक्षश्रेष्ठींकडून मिळाले आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे .

राम मंदिर वादावर सुरू असलेली सुप्रीम कोर्टातली सुनावणी जुलै २०१९पर्यंत पुढे ढकलावी, असं सिब्बल कोर्टात म्हणाले होते. 2019च्या निवडणुकांवर या निकालाचा परिणाम होईल असंही सिब्बल यांचं म्हणणं होतं. त्यावर रामजन्भूमीच्या निकालाचा आणि निवडणुकांचा काय संबंध असा प्रश्न मोदींनी विचारला होता.  तसंच ही  मागणीही न्यायाधीशांनी फेटाळून लावली.

पण सुन्नी बोर्डानं सिब्बलांच्या या दाव्यावर हरकत घेतली. त्यावर, मी सुन्नी वक्फ बोर्डाचा वकील नाहीच, असा धक्कादायक दावा सिब्बल यांनी केला होता. त्याच्यामुळेच त्यांना आता पक्षाकडून दणका मिळाला आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 7, 2017 12:55 PM IST

ताज्या बातम्या