News18 Lokmat

श्रीलंका स्फोट : त्या अतिरेक्याने बहीण आणि पत्नीचाही घेतला जीव

श्रीलंकेमध्ये झालेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटात 290 जणांचा बळी गेला तर 500 हून जास्त लोक जखमी झाले. हे बॉम्बस्फोट चर्च आणि हॉटेल्समध्ये घडवण्यात आले. ज्या आत्मघातकी अतिरेक्यांनी हे स्फोट घडवले त्यांच्यापैकीच एकाने या स्फोटात आपली पत्नी आणि बहीणीचाही बळी दिला.

News18 Lokmat | Updated On: Apr 22, 2019 08:15 PM IST

श्रीलंका स्फोट : त्या अतिरेक्याने बहीण आणि पत्नीचाही घेतला जीव

कोलंबो, 22 एप्रिल : श्रीलंकेमध्ये झालेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटात 290 जणांचा बळी गेला तर 500 हून जास्त लोक जखमी झाले. हे बॉम्बस्फोट चर्च आणि हॉटेल्समध्ये घडवण्यात आले. ज्या आत्मघातकी अतिरेक्यांनी हे स्फोट घडवले त्यांच्यापैकीच एकाने या स्फोटात आपली पत्नी आणि बहीणीचाही बळी दिला.

इन्सान सीलावन असं या आत्मघातकी अतिरेक्याचं नाव आहे. डिमेटोगोडा या कोलंबोच्या उपनगरात ही घटना घडली. कोलंबोच्या साखळी स्फोटांनंतर पोलीस जेव्हा या उपनगरात शोधमोहीम राबवत होते त्यावेळी या अतिरेक्याने स्वत:ला पेटवून घेतलं.

इमारत कोसळली

तो ज्या दुमजली इमारतीत होता ती इमारत स्फोटामुळे कोसळली. यामध्ये त्याची पत्नी आणि बहिणीचाही मृत्यू ओढवला. या स्फोटात 3 पोलीसही मारले गेले.

दहशतवाद्यांनी इस्टरच्या दिवशी पहिला स्फोट सकाळी पावणेनऊ वाजता सेंट अँथनी कॅथलिक चर्चमध्ये घडवला. दुसरा स्फोट शहराच्या बाहेरच्या भागातल्या नेगोंबोमध्ये सेंट सॅबेस्टियन चर्चमध्ये झाला. त्यानंतर लगेचच कोलंबोपासून 300 किमी अंतरावरच्या बॅक्टिलो शहरात तिसऱ्या चर्चमध्येही स्फोट झाल्याची बातमी आली.

Loading...

हॉटेल्समध्ये स्फोट

कोलंबोच्या 3 फाइव्ह स्टार हॉटेलमध्येही स्फोट घडवण्यात आले. शांग्रिला, सिनेमॉन ग्रँड आणि किंग्जबरी या हॉटेल्सना लक्ष्य करण्यात आलं होतं. त्यानंतर कोलंबोच्या नॅशनल झू जवळ एका हॉटेलमध्ये आणि डिमॅटोगोडामध्ये एका घरातही स्फोट झाला.

दहा दिवसांआधी इशारा

श्रीलंकेच्या पोलीस दलाने दहा दिवस आधीच या आत्मघातकी हल्ल्यांचा इशारा दिला होता. अतिरेकी देशातल्या चर्चेसना लक्ष्य करू शकतात, असंही पोलीस दलाने म्हटलं होतं.

या स्फोटांमागे नॅशनल तौहिद जमात या दहशतवादी संघटनेचा हात आहे, असं म्हटलं जातं. तामिळनाडूमध्येही या संघटनेच्या एका गटाच्या कारवाया सुरू आहेत. पण आतापर्यंत या संघटनेने हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही.

=================================================================================

SPECIAL REPORT : राज ठाकरेंना जशास तसे उत्तर, लावा रे तो व्हिडिओ!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 22, 2019 08:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...