कोलंबो, 22 एप्रिल : श्रीलंकेत झालेल्या बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर भारताने आपल्या सागरी सीमांवर हाय अलर्ट घोषित केला आहे. श्रीलंकेत स्फोट घडवणारे अतिरेकी भारतामार्गे पलायन करू नयेत म्हणून नौदलाची जहाजं आणि डॉर्नियर विमानं सागरी सीमांवर तैनात करण्यात आली आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिलं आहे.
चर्च आणि हॉटेल्समध्ये स्फोट
श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाला सिरीसेना यांनी सोमवार मध्यरात्रीपासून देशभरात आणिबाणी लागू केली आहे. ख्रिश्चनधर्मियांच्या ईस्टर डे ला चर्च आणि हॉटेलमध्ये 8 बॉम्बस्फोट करण्यात आले. यामध्ये सुमारे 290 जण मृत्युमुखी पडले तर 450 जखमी आहेत.
Indian Coast Guard sources: Coast Guard on high alert along the maritime boundary with Sri Lanka. Ships and maritime surveillance aircraft Dornier deployed on the maritime border to prevent any attempts by suicide bombing perpetrators to escape from Sri Lanka. pic.twitter.com/EXQB5mSCZm
— ANI (@ANI) April 22, 2019
या स्फोटात जेडीएसच्या दोन सदस्यांचाही मृत्यू ओढवला. कर्नाटकमधल्या जनता दल सेक्युलर या पक्षाचे 7 जण सुटीसाठी गेले होते. यातल्या दोन जणांचा मृत्यू ओढवला तर 5 जण बेपत्ता आहेत.
कोलंबोमध्ये कर्फ्यू
या स्फोटानंतर कोलंबोच्या बहुतांश भागात कर्फ्यू लावण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी 24 संशयितांना ताब्यात घेतलं आहे. कोलंबो एअरपोर्टवरही बॉम्ब सापडले, ते तात्काळ निकामी करण्यात आले, असं पोलिसांनी सांगितलं.
Reuters: Sri Lankan President Maithripala Sirisena to declare nationwide emergency from midnight on Monday following Easter Day blasts pic.twitter.com/41qoYo1HqU
— ANI (@ANI) April 22, 2019
या स्फोटात 35 परेदशी नागरिक मृत्युमुखी पडले. यात भारतीय आणि पाकिस्तानी नागरिकांचाही समावेश आहे. यामध्ये 5 जण दक्षिण भारतातले नागरिक आहेत. दहशतवाद्यांनी इस्टरच्या दिवशी पहिला स्फोट सकाळी पावणेनऊ वाजता सेंट अँथनी कॅथलिक चर्चमध्ये झाला. दुसरा स्फोट शहराच्या बाहेरच्या भागातल्या नेगोंबोमध्ये सेंट सॅबेस्टियन चर्चमध्ये झाला. त्यानंतर लगेचच कोलंबोपासून 300 किमी अंतरावरच्या बॅक्टिलो शहरात तिसऱ्या चर्चमध्येही स्फोट झाल्याची बातमी आली.
पोलिसांनी दिला होता इशारा
कोलंबोच्या 3 फाइव्ह स्टार हॉटेलमध्येही स्फोट घडवण्यात आले. शांग्रिला, सिनेमॉन ग्रँड आणि किंग्जबरी या हॉटेल्सना लक्ष्य करण्यात आलं होतं. त्यानंतर कोलंबोच्या नॅशनल झू जवळ एका हॉटेलमध्ये आणि डमेटोगोडामध्ये एका घरातही स्फोट झाला.
श्रीलंकेच्या पोलीस दलाने दहा दिवस आधीच या आत्मघातकी हल्ल्यांचा इशारा दिला होता. अतिरेकी देशातल्या चर्चेसना लक्ष्य करू शकतात, असंही पोलीस दलाने म्हटलं होतं.
या स्फोटांमागे नॅशनल तौहिद जमात या दहशतवादी संघटनेचा हात आहे, असं म्हटलं जातं. तामिळनाडूमध्येही या संघटनेच्या एका गटाच्या कारवाया सुरू आहेत. पण आतापर्यंत या संघटनेने हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही.
====================================================================================
VIDEO: आगीशी खेळण्याची जीवघेणी परंपरा, इथं एकमेकांवर फेकतात पेटत्या मशाली
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा