श्रीलंका स्फोट : कोलंबो बसस्थानकात सापडले 87 बॉम्ब

श्रीलंका स्फोट : कोलंबो बसस्थानकात सापडले 87 बॉम्ब

श्रीलंकेतल्या भीषण स्फोटानंतर पोलिसांच्या धडक कारवाईमध्ये कोलंबोमधल्या बस स्थानकावर 87 बॉम्ब सापडले. हे सगळे बॉम्ब आता निकामी करण्यात आले आहेत.

  • Share this:

कोलंबो, 22 एप्रिल : श्रीलंकेत रविवारी झालेल्या भीषण बॉम्बस्फोटानंतर अजूनही कोलंबोमध्ये बॉम्ब सापडत आहेत. श्रीलंकेच्या पोलिसांनी कोलंबोचा पूर्ण परिसर पिंजून काढत बॉम्ब निकामी करण्याचं काम सुरू ठेवलं आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईमध्ये कोलंबोच्या बस स्थानकावर 87 बॉम्ब सापडले. हे सगळे बॉम्ब आता निकामी करण्यात आले आहेत.

बॉम्ब निकामी करताना स्फोट

कोलंबोमधल्या एका चर्चमध्येही बॉम्ब सापडला. तो निकामी करताना त्याचा स्फोट झाला. त्यामुळे बॉम्बशोधक पथकाला बॉम्ब निकामी करताना खबरदारी घ्यावी लागते आहे.

या स्फोटानंतर कोलंबोच्या बहुतांश भागात कर्फ्यू लावण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 24 संशयितांना ताब्यात घेतलं आहे. कोलंबो एअरपोर्टवरही बॉम्ब सापडले, ते तात्काळ निकामी करण्यात आले, असं पोलिसांनी सांगितलं.

8 ठिकाणी स्फोट

श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाला सिरीसेना यांनी सोमवार मध्यरात्रीपासून देशभरात आणिबाणी लागू केली आहे. ख्रिश्चनधर्मियांच्या ईस्टर डे ला चर्च आणि हॉटेलमध्ये 8 बॉम्बस्फोट करण्यात आले. यामध्ये सुमारे 290 जण मृत्युमुखी पडले तर 450 जखमी आहेत.

दहशतवाद्यांनी इस्टरच्या दिवशी पहिला स्फोट सकाळी पावणेनऊ वाजता सेंट अँथनी कॅथलिक चर्चमध्ये झाला. दुसरा स्फोट शहराच्या बाहेरच्या भागातल्या नेगोंबोमध्ये सेंट सॅबेस्टियन चर्चमध्ये झाला. त्यानंतर लगेचच कोलंबोपासून 300 किमी अंतरावरच्या बॅक्टिलो शहरात तिसऱ्या चर्चमध्येही स्फोट झाल्याची बातमी आली.

चर्चेसना केलं लक्ष्य

कोलंबोच्या 3 फाइव्ह स्टार हॉटेलमध्येही स्फोट घडवण्यात आले. शांग्रिला, सिनेमॉन ग्रँड आणि किंग्जबरी या हॉटेल्सना लक्ष्य करण्यात आलं होतं. त्यानंतर कोलंबोच्या नॅशनल झू जवळ एका हॉटेलमध्ये आणि डमेटोगोडामध्ये एका घरातही स्फोट झाला.

श्रीलंकेच्या पोलीस दलाने दहा दिवस आधीच या आत्मघातकी हल्ल्यांचा इशारा दिला होता. अतिरेकी देशातल्या चर्चेसना लक्ष्य करू शकतात, असंही पोलीस दलाने म्हटलं होतं.

या स्फोटांमागे नॅशनल तौहिद जमात या दहशतवादी संघटनेचा हात आहे, असं म्हटलं जातं. तामिळनाडूमध्येही या संघटनेच्या एका गटाच्या कारवाया सुरू आहेत. पण आतापर्यंत या संघटनेने हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही.

==============================================================================================

VIDEO: आयफेल टॉवरची विद्युत रोषणाई बंद करून मृतांना श्रद्धांजलीबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 22, 2019 06:00 PM IST

ताज्या बातम्या