श्रीदेवीचं पार्थिव कुटुंबीयांकडे सुपूर्द,भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू

श्रीदेवीचं पार्थिव कुटुंबीयांकडे सुपूर्द केलं. त्यामुळे श्रीदेवीचं पार्थिव भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू झालीय. दुबई पोलिसांनी अधिकृतपणे केस बंद केली.

Sonali Deshpande | Updated On: Feb 27, 2018 04:15 PM IST

श्रीदेवीचं पार्थिव कुटुंबीयांकडे सुपूर्द,भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू

27 फेब्रुवारी : श्रीदेवीचं पार्थिव कुटुंबीयांकडे सुपूर्द केलं. त्यामुळे श्रीदेवीचं पार्थिव भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू झालीय. दुबई पोलिसांनी अधिकृतपणे केस बंद  केली. आता श्रीदेवी प्रकरणात दुबई पोलिसांकडून क्लीन चिट मिळालीय.

श्रीदेवीचं पार्थिव नेण्यासाठी कपूर परिवाराला दुबई पोलिसांकडून परवानगी मिळालीय. तसं कपूर परिवाराला प्रमाणपत्र दिलंय.भारतीय दुतावासालाही प्रमाणपत्र दिलं. आता पुढील प्रक्रियेसाठी श्रीदेवीचं पार्थिव नेण्यात येईल.त्यानंतर पार्थिव विमानतळावर नेण्यात येईल.

दरम्यान अर्जुन कपूर दुबईला रवाना झालाय, अशीही माहिती मिळते. बोनी कपूरवरचं संशयाचं जाळं अजून दूर झालेलं नाही.

काय आहेत दुबई पोलिसांचे सवाल ?

- श्रीदेवी दुबईत असताना बोनी मुंबईला का परतले ?

- अचानक पुन्हा दुबईला का गेले बोनी ?

- हॉटेलमध्ये पोहोचल्यावर दोघांत काय बोलणं झालं ?

- दोघांव्यतिरिक्त आणखी कुणी रूममध्ये होतं का ?

- श्रीदेवी चक्कर येऊन बाथटबमध्ये पडल्या का ?

- जर चक्कर आली होती तर त्याचं कारण काय ?

- श्रीदेवी बाथटबमध्ये आढळल्यावर किती वेळात पोलिसांना फोन गेला ?

- इतक्या मोठ्या हॉटेलमध्ये एकही डॉक्टर उपलब्ध नव्हते ?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 27, 2018 01:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close