राम मंदिर वादाबाबत श्री श्री रविशंकर योगी आदित्यनाथांना भेटले

राम मंदिर वादाबाबत श्री श्री रविशंकर योगी आदित्यनाथांना भेटले

आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. सकाळी साडे नऊच्या सुमाराला ही भेट झाली. श्री श्री रविशंकर राम मंदिराच्या मुद्द्यावर मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करतायेत.

  • Share this:

15 नोव्हेंबर : आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. सकाळी साडे नऊच्या सुमाराला ही भेट झाली. श्री श्री रविशंकर राम मंदिराच्या मुद्द्यावर मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करतायेत. आणि त्याबाबतच ते आदित्यनाथ यांना भेटले.

ही केवळ सदिच्छा भेट आहे, असं रविशंकर म्हणाले.  दरम्यान, श्री श्री रविशंकर यांनी मध्यस्थी करू नये, त्यांना तसा अधिकार नाही, अशी भूमिका वक्फ बोर्ड, काँग्रेस आणि एमआयएमनं घेतलीये. 5 डिसेंबरला सुप्रीम कोर्टात बाबरी मशीद खटल्याची सुनावणी आहे. त्याआधी मध्यस्थी करून सर्वानुमते काही एक तोडगा निघतोय का, याची चाचपणी श्री श्री रवीशंकर करतायत.

श्री श्री रविशंकर गुरुवारी अयोध्येतही जाणार आहेत. अयोध्येत जाऊन ते अनेक नेतेमंडळींशी संवाद साधणार आहेत. ते  अयोथ्येतल्या वादग्रस्त भूमीवरही जाणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 15, 2017 11:46 AM IST

ताज्या बातम्या