ग्वाल्हेरच्या राधा-कृष्णाला 100 कोटींच्या दागिन्यांचा साज

मध्यप्रदेशातल्या ऐतिहासिक ग्वाल्हेर शहरात असलेल्या प्राचिन कृष्णमंदिरातल्या मूर्तींना 100 कोटी रूपयांचे दागिने असून ते फक्त जन्माष्टमीलाच घातले जातात.

News18 Lokmat | Updated On: Sep 2, 2018 10:34 PM IST

ग्वाल्हेरच्या राधा-कृष्णाला 100 कोटींच्या दागिन्यांचा साज

ग्वाल्हेर, ता. 2 सप्टेंबर : गोकुळाष्टमीच्या पार्श्वभूमीवर देशभर उत्साहाचं वातावरण आहे. देशभरातल्या कृष्णमंदिरांमध्ये भाविकांची गर्दी असून कृष्णदर्शनासाठी भाविक आतूर झाले आहेत. भगवान श्रीकृष्ण हे सगळ्यांचं लाडकं दैवत. कृष्णाची कितीतरी रूपं गेली हजारो वर्ष भाविकांना भुरळ पाडत आहेत. तान्हा कृष्ण, बालकृष्ण, सखा कृष्ण, प्रेम करायला शिकवणारा कृष्ण, मार्गदर्शक कृष्ण, गीता सांगणारा कृष्ण आणि रणांगणावर अर्जुनाला लढायला भाग पाडणारा कृष्ण अशी कृष्णाची विविध रूपं भाविकांना आपलंसं करतात. मध्यप्रदेशातल्या ऐतिहासिक ग्वाल्हेर शहरात असलेल्या प्राचिन कृष्णमंदिरातल्या मूर्तींना 100 कोटी रूपयांचे दागिने असून ते फक्त जन्माष्टमीलाच घातले जातात.

ग्वाल्हेरच्या फुलबाग परिसरात शिंदे सरकारच्या काळापासून हे मंदिर असून त्यात राधा-कृष्णाची सुंदर मूर्ती आहे. 97 वर्ष जुनं हे मंदिर आहे. त्या काळापासून या मंदिरातल्या मूर्तींना अत्यंत सुंदर असे दागिने आहेत. हिरे, माणिक,पाचू, अस्सल मोत्यांमध्ये हे दागिने मढवलेले आहेत.

स्वातंत्रपूर्व काळात दररोज या मूर्तींना याच दागिन्यांचा साज होता. स्वातंत्र्यानंतर हे सर्व दागिने बँकेत ठेवण्यात आलेत. 2007 मध्ये ते महापालिकेच्या अधिकारात आले. तेव्हापासून जन्माष्टमीला ते दागिने कडक सुरक्षा व्यवस्थेत मंदिरात आणण्यात येतात. विश्वस्त त्याची पाहणी करतात आणि ते दागिने राधा-कृष्णांच्या मूर्तींना घातले जातात. हा साज झाल्यानंतर पहिल्या पूजेचा मान हा ग्वाल्हेरच्या महापौरांना आहे. त्यानंतर सर्व भाविक या सुंदर मूर्तींचं दर्शन घेतात.

 

PHOTOS : जम्मू ते मुंबई 'जन्माष्टमी'चा देशभर असा होता उत्साह!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 2, 2018 10:32 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close