अनैतिक संबंधात महिलाही दोषी?, सुप्रीम कोर्ट करणार समीक्षा

अनैतिक संबंधात महिलाही दोषी?, सुप्रीम कोर्ट करणार समीक्षा

विवाहबाह्य संबंधातील प्रकरणात फक्‍त पुरुषांना शिक्षा देणाऱ्या 157 वर्षे जुन्या कायद्यातील तरतुदीच्या घटनात्मक वैधतेची समीक्षा करण्याची गरज सुप्रीम कोर्टाने सांगितली असून यासंदर्भात नवीन तरतूदी करण्याचेही आदेश दिले आहेत.

  • Share this:

09 डिसेंबर : अनैतिक संबंधात फक्त पुरुषांनाच दोषी धरलं जातंय. मात्र, आता महिलांनाही या प्रकरणात दोषी धरायचं का ? याबद्दल पुन्हा विचार करण्याची गरज असल्याचं मत सुप्रीम कोर्टाने व्यक्त केलंय.

विवाहबाह्य संबंधातील प्रकरणात फक्‍त पुरुषांना शिक्षा देणाऱ्या 157 वर्षे जुन्या कायद्यातील तरतुदीच्या घटनात्मक वैधतेची समीक्षा करण्याची गरज सुप्रीम कोर्टाने सांगितली असून यासंदर्भात नवीन तरतूदी करण्याचेही आदेश दिले आहेत.

एकीकडे स्त्री-पुरूष समानता म्हणत असताना परपुरुषाशी स्वखुशीने संबंध ठेवणाऱ्या सज्ञान महिलेलाही या कायद्याअंतर्गत पीडित मानलं जातं. यासंदर्भात कायद्यात काय तरतुदी करता येतील यासंदर्भात केंद्र सरकारला नोटीस बजावण्यात आली असून चार आठवड्यांत आपले म्हणणे मांडण्याचे निर्देश दिले आहेत.

केरळाच्या जोसेफ साईन यांनी याचिका दाखल करून भारतीय दंड विधानातील कलम 497 च्या वैधतेला आव्हान दिले होते. या सुनावणीदरम्यान कोर्टाने हे आदेश दिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 9, 2017 04:42 PM IST

ताज्या बातम्या