‘COVID 19’मुळे भारतात Online मतदानाला होणार सुरुवात? या नेत्यांनी केली मागणी

‘COVID 19’मुळे भारतात Online मतदानाला होणार सुरुवात? या नेत्यांनी केली मागणी

गर्दी टाळण्यासाठी त्यावर Online मतदान हा पर्याय होऊ शकतो अशी शक्यता आता व्यक्त केली जात आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 7 जून: कोरोना व्हायरसमुळे सर्व जगाचा व्यवहारच बदलून गेला आहे. कोरोनावर रामबाण औषध सापडलं नाही तर हे संकट दीर्घकाळ चालण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे लोकांच्या जगण्याची दिशाच बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारतात निवडणूक हा उत्सवच असतो. त्यात कोट्यवधी माणसं सहभागी होतात. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी त्यावर Online मतदान हा पर्याय होऊ शकतो अशी शक्यता आता व्यक्त केली जात आहे.

काँग्रेसचे नेते शशी थरुर, बिहारचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते सुशील मोदी, अडिशनल सॉलिसिटर जनरल सत्यपाल जैन यांनी अशा ऑनाईन मतदानाबाबबत अनुकलता व्यक्त केलीय. थरुर यांनी हे मत आपलं व्यक्तिगत मत असल्याचं स्पष्ट केलंय.

अनेक विकसित देशांना मागे टाकत भारताने मतदान हे इलेक्ट्रीक व्होटिंग मिशनच्यासाह्याने घ्यायला फार पूर्वीच सुरुवात केलीय. मतमोजणीही त्यामुळे अतिशय कमी वेळेत होऊ लागली. त्यामुळे वेळ आणि पैशाचाही बचत झाली. मात्र त्यावर अजुनही आक्षेप घेतली जात आहेत. मात्र या मशिन्स हॅक करतात येतात हे अजुन कुणालाही सिद्ध करता आलेलं नाही.

कोरोना पॉझेटिव्ह महिलेने दिला मुलीला जन्म, नावं ठेवलं ‘सॅनिटायझर’!

आता वर्षभरात अमेरिकेत निवडणुका आहेत. तिथे काही याबाबत काही प्रयोग केले जाण्याची शक्यता आहे. तर विज्ञान आणि तंत्रज्ञान एवढं प्रगत झालेलं आहे की ऑनलाईन मतदान पद्धत विकसीत करता येऊ शकते असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं.

भारतात वारंवार निवडणुका होत असतात. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चही होत असतो. एवढं करूनही 60 टक्क्यांच्या आसपासच मतदान होतं असतं.

चीनच्या मुसक्या आवळण्यासाठी भारतानं केला मास्टर प्लान, जपानसोबत करणार मोठा करार

सार्वत्रिक निवडणुकांना अजुन चार वर्षांचा कालावधी असला तरी पुढच्या वर्षी पश्चिम बंगालच्या निवडणुका आहेत. त्यावेळी सगळ्यांचीच कसोटी लागणार आहे. ऑनलाईन मतदानाला सध्यातरी सर्वच राजकीय पक्ष मान्यता देण्याची शक्यता खूपच कमी आहे.  कोरोनामुळे जी परिस्थिती बदलली त्यामुळे यावर आता देशात चर्चा सुरू होणार आहे.

First published: June 7, 2020, 1:18 PM IST

ताज्या बातम्या