मराठी बातम्या /बातम्या /देश /देशात लशींचा तुटवडा; मात्र येथे रस्त्याच्या कडेला 12 तास उभा होता 2.4 लाख कोवॅक्सीनने भरलेला ट्रक

देशात लशींचा तुटवडा; मात्र येथे रस्त्याच्या कडेला 12 तास उभा होता 2.4 लाख कोवॅक्सीनने भरलेला ट्रक

इंजिन सुरू ठेवून ट्रक चालक बेपत्ता झाल्याचे वृत्त आहे.

इंजिन सुरू ठेवून ट्रक चालक बेपत्ता झाल्याचे वृत्त आहे.

इंजिन सुरू ठेवून ट्रक चालक बेपत्ता झाल्याचे वृत्त आहे.

नरसिंहपुर, 1 मे : देशात जिथे सद्यपरिस्थितीत कोरोना लशीची कमतरता भासत आहे. (Corona Vaccine) तर दुसरीकडे मध्य प्रदेशातील नरसिंहपुर (Narsinghpur) जिल्ह्यात 2.4 लाख कोवॅक्सीनने भरलेला (Covaccine) एक ट्रक रस्त्याच्या कडेला उभा असल्याचं दिसलं. या ट्रकमधील कोवॅक्सीनचं मूल्य 8 कोटीं रुपये इतकं आहे. या ट्रकचं इंजिन स्टार्ट होतं आणि ड्रायव्हर बेपत्ता होता. इंजिन सुरू असल्याने ट्रकचे रेफ्रिजेरेटर सुरू होते. त्यामुळे अशी अपेक्षा आहे की, ट्रकच्या कंटेनरमध्ये ठेवलेल्या कोवॅक्सीनच्या 2.40 लाख खुराक सुरक्षित होईल.

नरसिंहपुर जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक विपुल श्रीवास्तव यांनी शनिवारी सांगितलं की, या वाहनाचा रजिस्ट्रेशन क्रमांक टीएन 06 क्यू 6482 आहे आणि शुक्रवारी रात्री तब्बल 12 तास ट्रक उभा होता. त्यानंतर त्याला रवाना करण्यात आलं. ते म्हणाले की, कोवॅक्सीनच्या लशीचा खुराक हैद्राबादमधून आणलं होतं. त्यांनी सांगितलं की, शुक्रवारी दुपारी पोलिसांनी याबाबत सूचना मिळाली होती.

हे ही वाचा-कर्फ्यूदरम्यान मैत्रिणी पडल्या घराबाहेर; VIDEO मध्ये पाहा काय झालेत हाल!

श्रीवास्तवने सांगितलं की, आम्ही गुरुग्रामच्या ट्रान्सपोर्ट कंपनी टीसीआयशी संपर्क केला आणि त्यांनी चालक शिवाय ट्रकच्या बाबत माहिती दिली. कंपनीने जीपीएस सिस्टमच्या माध्यमातून याबाबत माहिती मिळवली. ते या ड्रायव्हरशी संपर्क करू शकत नव्हते, त्यानंतर ती चिंतीत झाले. श्रीवास्तव पुढे म्हणाले की, लॉरीटा ड्रायव्हर विकास मिश्रा अद्यापही बेपत्ता आहेत. आम्हाला त्याचा मोबाइल घटनास्थळापासून 16 किमी लांब आढळला.

या ड्रायव्हरला लुटण्यात आल्याबाबत विचारलं असता त्यांनी सांगितलं की, घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार या वाहन चालकाला लुटण्यात आलं नव्हतं. असं झालं असतं तर आतापर्यंत हा वाहन चालक सापडला असता. यामागे काही कौटुंबिक कारण असल्याचं सांगितलं जात आहे.

First published:
top videos

    Tags: Corona vaccine, Corona virus in india