‘पोलिसांना उडवा, नाहीतर तुम्हाला उडवेन’ म्हणत गँगस्टर विकास दुबेनं घडवून आणलं शूटआऊट

‘पोलिसांना उडवा, नाहीतर तुम्हाला उडवेन’ म्हणत गँगस्टर विकास दुबेनं घडवून आणलं शूटआऊट

काही दिवसांपूर्वीच गँगस्टर विकास दुबे याचं एन्काऊंटर करण्यात आलं होतं. याने 8 निष्पाण पोलिसांची हत्या केली होती

  • Share this:

कानपूर, 14 जुलै : येथून अटक झालेला विकास दुबेचा सहकारी शशिकांतने मीडियासमोर मोठा खुलासा केला आहे. विकास दुबे याच्यामुळे गोळी चालविण्यात आल्याची माहिती शशिकांत याने माध्यमांना दिली. त्याने सांगितले की, - विकास दुबे याने सर्वांना सांगितले होते की आज त्यांना मारले पाहिजे. शशिकांत याच्या घरात सीओसह दोन पोलिसांवर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. या संपूर्ण हत्येत 8 पोलिसांची हत्या झाली.

विकास दुबेचा सहकारी शशिकांत याला कानपूर येथून अटक करण्यात आली आहे. यादरम्यान त्याने घटनेच्या रात्रीचे संपूर्ण सत्य माध्यमांसमोर सांगितले. शशिकांत हा विकास दुबे याचा मामा प्रेम प्रकाश यांचा मुलगा आहे. यूपी पोलिसांनी प्रेम प्रकाश आणि अतुल यांची 3 जुलै रोजी हत्या केली. शशिकांतला पोलिसांच्या लुटलेल्या रायफल्ससह अटक करण्यात आली आहे.

हे वाचा-इंग्लंड, फ्रान्समध्येही आता mask बंधनकारक; नाहीतर होणार ही शिक्षा

विकास दुबेचा साथीदार शशिकांत याला पोलिसांनी केलं अटक

शशिकांत म्हणाला की, संपूर्ण शूटआऊट विकासाच्या सांगण्यावरून करण्यात आलं. तो म्हणाले की -आज सर्वांना मारले पाहिजे. त्याने आम्हाला धमकी देऊन गोळी मारायला सांगितली. विकासने ही घटना घडवून आणण्यासाठी शस्त्रास्त्रांची व्यवस्था केली होती. शशिकांतने गोळी चालणाऱ्यांनी नावेही उघड केली. त्याने सांगितले की सीओसमवेत माझ्या घरात दोन पोलिसांना गोळ्या घालण्यात आल्या. काही दिवसांपूर्वीच गँगस्टर विकास दुबे याचं एन्काऊंटर करण्यात आलं होतं. याने 8 निष्पाण पोलिसांची हत्या केली होती. पोलिसांसोबत गाडीने जात असताना झालेल्या अपघातात विकास पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना पोलिसांनी त्याचं एन्काऊंटर केलं.

Published by: Meenal Gangurde
First published: July 14, 2020, 10:34 PM IST

ताज्या बातम्या