भारत-पाकिस्तानात तणाव, हवाई दलातल्या दोन नेमबाजांना कामावर बोलावून घेतलं

भारत-पाकिस्तानात तणाव, हवाई दलातल्या दोन नेमबाजांना कामावर बोलावून घेतलं

नेमबाज रवी कुमार आणि दीपक कुमार यांना वायुसेनेनं परत कामावर बोलावलंय. दोघांनी ही माहिती दिलीय.

  • Share this:

नवी दिल्ली, 27 फेब्रुवारी : नेमबाज रवी कुमार आणि दीपक कुमार यांना वायुसेनेनं परत कामावर बोलावलंय. दोघांनी ही माहिती दिलीय. गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडींमुळे काश्मिरातील वातावरण तापलं आहे. सीमेवर भारत आणि पाकिस्तानच्या सैन्यामध्ये सतत चकमकी सुरू आहेत.दोन्ही देशात तणावाचं वातावरण आहे.

आयएसएसएफ वर्ल्ड कपचे कान्स्य पदक विजेते रवी कुमार यांनी सांगितलं, 'आम्हाला हवाई दलाच्या क्रीडा नियंत्रण बोर्डाच्या सचिवानं बोलावलंय. प्रत्येक स्पर्धेनंतर आम्हाला असा आदेश मिळतो. त्यात भविष्यातल्या योजनांबद्दल विचारलं जातं. आताच्या परिस्थितीनुसार आम्हाला काय करायचं ते सांगितलं जाईल. आम्ही त्याचं पालन करू.'

रवी हवाई दलाच्या ग्राऊंड स्टाफमध्ये आहेत.ते म्हणाले, ते ज्युनियर वाॅरंट अधिकारी आहेत आणि पाच-सहा तळांवर त्यांना लक्ष ठेवायचंय.

ते पुढे म्हणाले गरज पडली तर मी सैन्याबरोबर जायला तयार आहे. अभ्यास आणि खेळ नंतर येतो. देशाच्या सेवेसाठी आम्ही नेहमीच तयार आहोत.

दीपक कुमारही म्हणाले, आम्हाला बोलावणं येणं हे सर्वसाधारण आहे. पाहू आता ते काय म्हणतायत. त्यांचा आदेशाचं पालन करू.

दीपक यांनी वर्ल्ड कपमध्ये कांस्य आणि आशियाई खेळात रजत पदक पटकावलंय.

जम्मू-काश्मीरमधील शोपियानमध्ये पाककडून गोळीबार करण्यात आला. त्याला भारतानेही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी भारताने पाकच्या 5 चौक्या उद्ध्वस्त केल्या तसंच पाकिस्तानचे काही सैनिकही मारले गेल्याची माहिती आहे. भारताने दहशतवाद्यांच्या तळावर हवाई हल्ला केल्यानंतर मंगळवारी संध्याकाळपासून पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात येत आहे. त्यानंतर भारतानेही चांगलंच प्रत्युत्तर दिलं आहे.


पाकिस्तानाच्या सर्व कारवाया नेस्तनाबुत करतील ही लढाऊ विमानं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 27, 2019 07:27 PM IST

ताज्या बातम्या