दहशतवादाचं समर्थन करणाऱ्या भारतीयांना गोळ्या घाला- योगेश्वर दत्त

दहशतवादाचं समर्थन करणाऱ्या भारतीयांना गोळ्या घाला- योगेश्वर दत्त

पुलवामा हल्ल्यानंतर योगेश्वर दत्तनं संतप्त प्रतिक्रिया देत दहशतवादाचं समर्थन करणाऱ्या भारतीयांना गोळ्या घाला असं ट्विट केलं आहे.

  • Share this:

मुंबई, 17 फेब्रुवारी : पुलवामा येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या आत्मघातकी हल्ल्यामध्ये 40 जवान शहीद झाले. त्यानंतर देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. राजकारण, खेळ या क्षेत्रातील दिग्गजांनी दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. दरम्यान ऑलंम्पिक गोल्ड मेडलिस्ट योगेश्वर दत्त यांनं दहशतवादाचं समर्थन करणाऱ्या भारतीयांना गोळ्या घाला असं ट्विट केलं आहे. आता कडक पावलं उचलण्याची वेळ आली आहे. आता जशास तसे उत्तर देण्याची वेळ आली आहे. ज्या भारतीय व्यक्ती दहशतवादाचं समर्थन करत आहेत, त्यांना गोळ्या घाला असं योगेश्वर दत्तनं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

आता आपण अमेरिका आणि इस्त्रायल यांच्याप्रमाणे बदला घ्यायला हवा. बदला अशा प्रकारचा हवा की, दहशतवादी जन्म घेण्यापूर्वी हजार वेळा विचार करेल.

">

पाकिस्तानला दोष का द्यायचा? - सिद्धू

गुरूवारी पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघातकी हल्ल्यानंतर देशात सध्या संतापाची लाट उसळली आहे. त्यानंतर देशभरातून पाकिस्तानला धडा शिकवा, दहशतवाद्यांचा खात्मा करा अशा घोषणा दिल्या जात आहेत. या भ्याड हल्ल्यानंतर माजी क्रिकेटर आणि पंजाबचे कॅबिनेट मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांनी 'दहशतवादाला धर्म आणि देश नसतो' अशी प्रतिक्रिया दिली होती. सिद्धू यांच्या या प्रतिक्रियेनंतर देशभरातून संतापाची लाट उसळली. लोकांनी त्यांची 'द कपिल शर्मा शो'मधून हकालपट्टी करण्याची मागणी केली.

जनतेच्या या रोषामुळे सोनी टिव्हीनं नवज्योत सिंग सिद्धू यांना 'द कपिल शर्मा' शोमधून काढण्याचा निर्णय घेतला. सिद्धूच्या जागी आता अभिनेत्री अर्चना पुरण सिंगला घेतलं गेलंय.

VIDEO: जो आग आपके दिल में है, वही आग मेरे भी दिल में है - मोदी

First published: February 17, 2019, 6:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading