धक्कादायक! भाजप नेत्याकडून लॉकडाऊनचं उल्लंघन, घरात सुरू होतं चित्रपटाचं शूटिंग

धक्कादायक! भाजप नेत्याकडून लॉकडाऊनचं उल्लंघन, घरात सुरू होतं चित्रपटाचं शूटिंग

माजी खासदाराच्या घरात चित्रपटाचं शूटिंग पाहण्यासाठी गावकऱ्यांनी गर्दी केली होती.

  • Share this:

नवी दिल्ली, 31 मार्च : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी कोरोना व्हायरसचा (Coronavirus) खात्मा करण्यासाठी 14 एप्रिलपर्यंत देशभरात लॉकडाऊनची (Lockdown) घोषणा केली आहे. मात्र यादरम्यान त्यांच्या पक्षातील नेता लॉकडाऊनचं उल्लंघन करीत असल्याचे समोर आले आहे.

सुपौलचे माजी खासदार आणि भाजपचे (BJP) नेते विश्वमोहन कुमार यांनी लॉकडाऊनच्या काळात आपल्या घरात सिनेमाचं शूटिंगचं आयोजन केलं आहे. ज्यामध्ये शेकडोच्या संख्येने सिनेमात काम करणारे लोक गावात दाखल झाले आहेत. काही काळ त्यांनी बिहार सरकारमध्ये मंत्रिपद भूषविलं होतं. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग आवश्यक असतं. यासाठी केंद्र सरकारने लॉकडाऊन जाहीर करीत सर्वांना घरात थांबवण्याचं आवाहन केलं आहे. मात्र भाजपच्या नेत्याकडूनही या नियमांची पायमल्ली केली जात असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.

संबंधित - अजित पवारांच्या मोठ्या निर्णयावर नितेश राणेंची सडकून टीका, म्हणाले...

या सर्व गोष्टींचा खुलासा झाल्याने लॉकडाऊनमध्ये आयोजित केलेल्या या चित्रीकरणावरुन बिहारमधील सुपौलचे माजी खासदार विश्वमोहन कुमार व चित्रपटाच्या निर्मात्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी चित्रीकरण करणाऱ्या कंपनीचे कॅमेरे जप्त केले आहेत. लॉकडाऊन असतानाही भोजपुरी चित्रपट 'इश्क दिवाना' या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होतं. चित्रीकरण पाहाण्यासाठी गावकऱ्यांची मोठी गर्दी जमा झाली होती. सध्या देशभरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. अशावेळी लोकप्रतिनिधींनीकडून अशी वागणूक अपेक्षित नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. लॉकडाऊनचे नियम तोडल्याप्रकरणी विश्वमोहन कुमार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित -  VIDEO आई गं खायला मिळालं..भरउन्हात उपाशी चाललेल्या चिमुरड्याच्या चेहऱ्यावर हास्य

First published: March 31, 2020, 5:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading