शिमला, 20 ऑगस्ट : हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यात पंजाब आणि हिमाचलच्या सीमेवरील चक्की नदीवर उभारण्यात आलेल्या 800 मीटर लांब रेल्वे पूल शनिवारी कोसळल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चक्की नदीच अचानक आलेल्या पुरामुळे रेल्वे पुलाचे खांब खिळखिळे झाले होते.
या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुदैवाने हा पुल जेव्हा कोसळला तेव्हा यावर कोणीही नव्हतं. अन्यथा मोठा अपघात झाला असता.
Himachal Pradesh | Chakki bridge in Kangra district collapsed today, says ADM Kangra, Rohit Rathore.
Heavy rainfall is likely in Kangra, Chamba, Bilaspur, Sirmaur, and Mandi districts today. (Photo source: Screenshot from viral video) pic.twitter.com/qAushMTsZH — ANI (@ANI) August 20, 2022
90 वर्षे जुना पूल..
रेल्वे पुलाचे नवे खांब तयार करेपर्यंत पठाणकोट आणि जोगिंद्रनगरमधील नॅरो गेज ट्रेन सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. 1928 साली इंग्रजांनी या पुलाची निर्मिती केली होती. यानंतर पठाणकोट आणि जोगिंद्रनगर यादरम्यान दररोज सात ट्रेन ये-जा करीत होती. पोंग बांध वन्यजीव अभयारण्याजवळील शेकडो गावांसाठी ही रेल्वे लाइन एका लाइफलाइनप्रमाणे आहे. येथे कोणतीही रस्ते वा बससेवा नाही. गावकरी कांगडाच्या जिल्हा मुख्यालयापर्यंत पोहोचण्यासाठी ट्रेन सेवेचा उपयोग करीत होते.
नदीच्या तळात झालेल्या अवैध खोदकामामुळे 90 वर्षे जुना रेल्वे पुल कमकुवत झाला होता. अवैध खोदकाममुळे पुलाचं नुकसान होत असल्याची तक्रार रेल्वे अधिकाऱ्यांना करण्यात आली होती. गेल्या महिन्यात पुलाच्या एका पिलरवर भेगा पडल्या होत्या. ज्यानंतर ट्रेन सेवा रद्द करण्यात आल्या होत्या. आता तर पुराच्या पाण्यामुळे खांबचं वाहून गेला आहे. कांगडा जिल्ह्यात अनेक नद्यांना पूर आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.