हा घोटाळा तर नाही? महिला शिक्षिकेने 25 शाळांमध्ये काम करून मिळवला 1 कोटी पगार

हा घोटाळा तर नाही? महिला शिक्षिकेने 25 शाळांमध्ये काम करून मिळवला 1 कोटी पगार

हे अशक्य वाटतं, पण वास्तवात घडलं आहे. सर्व शिक्षकांचा रोजचा डिजिटल डेटाबेस असूनही असा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

  • Share this:

लखनऊ, 05 जून : एकच शिक्षिका 25 शाळांमध्ये काम करते ही बाब कोणालाच नाही पटणार, पण हे खरंच घडलं आहे. बरं इतकंच नाही तर काही महिन्यांमध्ये या शिक्षिकेने एक कोटी रुपये पगारही मिळवला आहे. हे अशक्य वाटतं, पण वास्तवात घडलं आहे. सर्व शिक्षकांचा रोजचा डिजिटल डेटाबेस असूनही असा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

ही शिक्षिका उत्तर प्रदेशच्या कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात पूर्णवेळ काम करत होती. पण त्याचसोबत आंबेडकर नगर, बागपत, अलिगड, सहारनपूर आणि प्रयागराज यासारख्या जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये याच नावाची शिक्षिका काम करत असल्याचं समोर आलं. शिक्षकांचा डेटाबेस तयार केला जात असताना ही बाब उघडकीस आली नाही.

इतर शिक्षकाशी संपर्कात नाही महिला शिक्षिका

मानवी सेवा पोर्टलवरील शिक्षकांच्या डिजिटल डेटाबेसमध्ये शिक्षकांची सर्व माहिती अपलोड होत असते. एकदा असाच रेकॉर्ड अपलोड झाला आणि धक्कादायक माहिती समोर आली. अनामिका शुक्ला ही शिक्षिका एकाच माहितीसह तब्बल 25 शाळांमध्ये काम करत असल्याचं समोर आलं. शालेय शिक्षण महासंचालक विजय किरण आनंद यांनी सांगितलं की, या शिक्षिकेविषयी अधिक माहिती मिळवण्याचं काम सुरू असून तिच्याशी अद्याप संपर्क झाला नाही.

खरंतर, उत्तर प्रदेशच्या प्राथमिक शाळांमध्ये प्रत्येक शिक्षकांच्या उपस्थितीची माहिती ठेवली जाते, पण असं असतानाही असा प्रकार होणं म्हणजे आश्चर्यकारक आहे. मार्चमध्ये या शिक्षिकेबद्दल तक्रार देण्यात आली होती. सर्व शाळांमधील नोंदीनुसार शुक्ला एका वर्षापेक्षा जास्त काळ या शाळांमध्ये कार्यरत होती. निवासी शाळांमध्ये दरमहा सुमारे 30,000 रुपये दिले जातात. जिल्ह्यातील प्रत्येक गटात कस्तुरबा गांधी शाळा आहेत.

फेब्रुवारी 2020 पर्यंत घेतला एक कोटी रुपये पगार

अनामिका शुक्ला या शिक्षिकेने फेब्रुवारी 2020 पर्यंत या शाळांकडून पगार म्हणून एक कोटी रुपये घेतले आहेत. मैनपुरीची रहिवासी अनामिका शुक्ला शेवटची फेब्रुवारीपर्यंत रायबरेली इथल्या केजीबीव्हीमध्ये काम करताना आढळली. त्याचवेळी तिचा हा खोटेपणा समोर आला. त्यानंतर आता अधिक तपास सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे.

संपादन - रेणुका धायबर

First published: June 5, 2020, 3:56 PM IST
Tags:

ताज्या बातम्या