धक्कादायक! गो-तस्करीच्या संशयावरुन दोघांना बेदम मारहाण

धक्कादायक! गो-तस्करीच्या संशयावरुन दोघांना बेदम मारहाण

मात्र या दोघांना विनाकारण मारहाण केल्याचा आरोप जखमींच्या कुटुंबीयांनी केला आहे

  • Share this:

अलवर, 17 फेब्रुवारी : मॉब लिंचिंग आणि गो-तस्करीच्या कारणाने देशभरात बदनाम झालेल्य़ा अलवर जिल्ह्यात पुन्हा एकदा जमावाने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. येथे गो-तस्करीच्या आरोपाखाली जमावाने गायी नेणाऱ्या दोघांना मारहाण केली. गर्दीतून पळ काढण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांची गाडी एका घराला धडकली आणि त्यात ते गंभीर जखमी झाले.

लोकांचा आरोप आहे की दोघे फायरिंग करुन पळून गेले होते. मात्र या दोघांना विनाकारण मारहाण केल्याचा आरोप जखमींच्या कुटुंबीयांनी केला आहे. माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि दोन्ही जखमींना अलवरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

गोविंदगड परिसरातील न्याणा गावातील घटना

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी साधारण 6.30 मिनिटांनी ही घटना घडली. तेथे दोघे जण जयपूरमधील हटवाडापासून तीन गायींना गाडीतून घेऊन जात होते. गोविंदगड येथील काही गोरक्षकांनी गाडी थांबवून त्यांची चौकशी केली. मात्र व्यवस्थित उत्तर न मिळाल्याने गोरक्षकांना त्यांचा संशय आला व त्यांनी दोघांना मारहाण केली.

पीडितांवर पोलिसांच्या सुरक्षेत उपचार सुरू आहे

जमावाने हल्ला केल्यावर त्यांची गाडी असंतुलित झाली आणि समोरील घराला धडकली. यामुळे गाडीत बसलेले दोघे गंभीर जखमी झाले. पोलिसांना याची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले आणि जखमींना अलवरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांची ओळख हरियाण्यातील नगीना पोलीस ठाण्यातील वहीद आणि सीकरी भरतपुरचे निवासी आहेत. ही गाडी गायींना घेऊन रात्री साधारण 2.30 वाजता जयपुरहून हरियाणा रवाना झाली होती. पीडितांचे म्हणणे आहे की त्यांच्याकडे जयपूर नगर निगमची पावतीदेखील आहे.

First published: February 17, 2020, 3:51 PM IST
Tags: cow

ताज्या बातम्या