मराठी बातम्या /बातम्या /देश /

कंडोम, ड्रग्ज आणि बरंच काही..! आठवीतील विद्यार्थ्यांच्या बॅगेतील सामान पाहून सगळे शॉक, शाळेनं उचललं हे पाऊल

कंडोम, ड्रग्ज आणि बरंच काही..! आठवीतील विद्यार्थ्यांच्या बॅगेतील सामान पाहून सगळे शॉक, शाळेनं उचललं हे पाऊल

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

आठवी, नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांच्या बॅग तपासण्यास सुरुवात झाली असता आतमध्ये कंडोम, कॉन्‍ट्रासेप्टिव्ह, लायटर, सिगरेट आणि व्हाईटनरसारख्या वस्तू सापडल्या. शहरातील अनेक शाळांमध्ये अचानक तपासणी करण्यात आली होती.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Karnataka, India
  • Published by:  Kiran Pharate

बंगळुरू 01 डिसेंबर : शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ब‌ॅगमध्ये काय सामान असू शकतं? असा प्रश्न तुम्हाला कोणी विचारला तर सहाजिकच कोणीही वही, पुस्तकं, कंपास बॉक्स, पेन, पेन्सिल, खोडरबर असंच उत्तर देईल. मात्र, बंगळुरूमधील शाळांमध्ये जेव्हा विद्यार्थ्यांचं दप्तर तपासलं गेलं, तेव्हा त्याच्या आतील सामान पाहून तपासणी करणारेही थक्क झाले. विद्यार्थ्यांच्या दप्तरात असं काही सापडेल याची कल्पनाही कोणी केली नव्हती.

मुंबईच्या रस्त्यावर कोरियन तरुणीसोबत लाज वाटणारे कृत्य, तरुणाने हात पकडला आणि... VIDEO

खरं तर वर्गात मोबाईल घेऊन जाणाऱ्या विद्यार्थ्यांला कंटाळून शाळा व्यवस्थापनाने दप्तरांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, जेव्हा तपासणी सुरू झाली तेव्हा काही विद्यार्थ्यांनी आपल्या बॅग दाखवण्यास नकार दिला. आठवी, नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांच्या बॅग तपासण्यास सुरुवात झाली असता आतमध्ये कंडोम, कॉन्‍ट्रासेप्टिव्ह, लायटर, सिगरेट आणि व्हाईटनरसारख्या वस्तू सापडल्या. शहरातील अनेक शाळांमध्ये अचानक तपासणी करण्यात आली होती.

वृत्तानुसार, अनेकांनी तक्रार केली होती की विद्यार्थी वर्गात मोबाईल घेऊन जात आहेत. यानंतर बॅग तपासणी करण्याचे ठरले. डेक्कन हेराल्डने वृत्त दिले आहे की कर्नाटक प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या असोसिएटेड व्यवस्थापनाने शाळांना विद्यार्थ्यांच्या दप्तरांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. आक्षेपार्ह साहित्य मिळाल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांना याची माहिती देण्यात आली आणि शाळकरी मुलांचे समुपदेशनही करण्यात आले.

बसमध्ये गळा चिरलेल्या अवस्थेत आढळला व्यक्ती; बॅगमधील सामान पाहून पोलिसांनाही बसला धक्का

शिक्षकांनी सांगितलं की काही पालकांना त्यांच्या मुलाच्या बॅगमध्ये ड्रग्ज सापडले यावर विश्वास बसत नव्हता. त्यामुळे काही पालकांनी आपल्या मुलांमध्ये अचानक मोठा बदल झाल्याचे मान्य केले. अशा सर्व विद्यार्थ्यांवर सतत लक्ष ठेवले जाईल, वारंवार समुपदेशन केले जाईल आणि त्यांच्या पालकांकडून अभिप्राय घेतला जाईल, असे शाळा व्यवस्थापनाने म्हटले आहे. अशा कोणत्याही मुलाला निलंबित करण्यात आलेले नाही. ते शाळेत येत असून त्यांची माहिती नियमित घेतली जात आहे. यातील काही मुलांसाठी समुपदेशनाची शिफारस करण्यात आली आहे. त्याचबरोबर काही पालकांना मुलांसाठी बाहेरून मदत घेण्यास सांगितले असून त्यांना 10 दिवसांपर्यंत सुट्टी देण्यात आली आहे.

First published:

Tags: School student, Shocking news