धक्कादायक! घरमालकाने माणुसकी सोडली, कोरोनाशी दोन हात करणाऱ्या नर्सला सांगितलं दुसरं घर शोधा

येथे भाडेकरु म्हणून राहणाऱ्या 15 कुटुंबीयांनी कोरोनावर उपचार करणाऱ्या नर्सला तेथे राहण्यासाठी नकार दर्शवला.

येथे भाडेकरु म्हणून राहणाऱ्या 15 कुटुंबीयांनी कोरोनावर उपचार करणाऱ्या नर्सला तेथे राहण्यासाठी नकार दर्शवला.

  • Share this:
    पाटना, 8 एप्रिल : त्या दिवशी मेडिकल कॉलेजमध्ये कोरोनाच्या (Covid -19) रुग्णांची संख्या थोडी जास्त होती. नर्स सविताला रुग्णालयातून घरी निघण्यासाठी थोडा उशिरच झाला होता. ड्यूटी संपताच सविता धावतच घराच्या दिशेने निघाली. ती घराजवळ पोहचताच, तेथे घरमालकाचा मुलगा धीरज रागाने तिच्याकडे पाहत होता. काहीतर गडबड असल्याचे सविताच्या लक्षात आहे. सविता मुख्य गेट उघडून आत यायला लागली तोच धीरज धावतचं तिच्यावर आला व ओरडू लागला. न्यूज 18 इंडियाशी बातचीत करीत असताना सविताने सांगितले की, धीरज तिच्याशी अत्यंत वाईट पद्धतीने बोलत होता. तिने मेन गेटच्या लॉकला हात लावल्यावरुन तिच्याशी वाईट पद्धतीने बोलत होता. यापुढे जाऊन तो म्हणाला, तुम्ही या लॉकला हात लावला आहे, आता कोणाला कोरोना झाला तर कोण जबाबदार असेल? याचं सविताला वाईट वाटलं. यानंतर धीरज विविध कारणांनी सविताला त्रास देत होता. तिच्या येण्या-जाण्याच्या वेळांवरही तो आडकाठी आणत होता. एकेदिवशी त्याने सविताला सांगितले की, तिने राहण्यासाठी वेगळी जागा शोधावी. हे ऐकताच सविताला खूप वाईट वाटलं. आधीच रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. रुग्णालयात खाण्याची उसंत मिळत नाही त्यात आता लॉक़डाऊन आणि कोरोनाच्या संकटात दुसरं घर कसं मिळणार? या विचाराने ती अस्वस्थ झाली. संबंधित - लढा जिंकूच! ‘या’ राज्याने तयार केली Covid-19 किट, 55 मिनिटांत लागणार निकाल यानंतर सवितासोबत काम करणाऱ्या सहकारी नर्सेसनी तिला आपल्या घरी राहायला बोलावले. सविता सध्या सिस्टर प्रमिलासोबत त्यांच्या घरी राहत आहे. मात्र कोरोनाच्या लढ्यातील योद्ध्यांना अशी वागणूक मिळणे माणुसकीला धरून नाही. धीरज यांच्याकडे आणखी 15 भाडेकरु राहत आहेत. त्यांनीही सविताला तेथे राहण्यास नकार दर्शविला होता. ही गोष्ट सविताला आताही त्रास देते. मात्र सध्या फक्त कोरोना संकटाची लढा देणं हेच मुख्य ध्येय असल्याचे ती सांगते. संबंधित - आशेचा किरण! देशातील 400 जिल्ह्यांमध्ये Covid – 19 चा एकही रुग्ण नाही     संपादन - मीनल गांगुर्डे
    First published: