मराठी बातम्या /बातम्या /देश /

धक्कादायक! अख्खं पोलीस ठाणे झालं क्वारंटाइन, संशयित बेपत्ता झाल्याने धावाधाव

धक्कादायक! अख्खं पोलीस ठाणे झालं क्वारंटाइन, संशयित बेपत्ता झाल्याने धावाधाव

पोलीस ठाण्यातील 51 पोलीस क्वारंटाइन करण्यात आल्याने नवीन प्रमुखांची नेमणूक करण्यात आली आहे.

पोलीस ठाण्यातील 51 पोलीस क्वारंटाइन करण्यात आल्याने नवीन प्रमुखांची नेमणूक करण्यात आली आहे.

पोलीस ठाण्यातील 51 पोलीस क्वारंटाइन करण्यात आल्याने नवीन प्रमुखांची नेमणूक करण्यात आली आहे.

  • Published by:  Meenal Gangurde
प्रयागराज, 26 एप्रिल : मुंबईहून आलेल्या दोन कोरोना (Coronavirus) पॉझिटिव्ह भावांच्या ड्रायव्हरच्या संपर्कात आल्यामुळे संपूर्ण कौंधियारा पोलीस ठाण्याचे कर्मचारी क्वारंटाइन झाले आहेत. ड्रायव्हर आपल्या वैयक्तिक कामासाठी दोन दिवसांपूर्वी कौंधियारा पोलीस ठाण्यात आला होता. यानंतर एसएसपी यांनी खबरदारी  म्हणून एसओसह 51 पोलिसांना क्वारंटाइन ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, चालक बेपत्ता आहे आणि पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांना क्वारंटाइन केल्यामुळे नवीन प्रमुखांची भरती करण्यात आली आहे. सर्व 51 पोलिसांना जवळच्या शाळेत क्वारंटाइन करण्यात आलं आहे. त्याशिवाय शंकरगडच्या कपारी गावातील दोन कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या भावांच्या संपर्कात आलेल्या  192 लोकांना पोलीस आणि प्रशासनाने क्वारंटाइन केलं आहे. यासह त्यांचे नमुने कोरोना तपासणीसाठी प्रयोगशाळेत  पाठविण्यात आले आहेत. मुंबईहून आपल्या वडिलांच्या अंत्यदर्शनासाठी आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह या दोन भावांसोबत 25 हून अधिक लोकांवर शंकरगड पोलीस स्टेशनमध्ये लॉकडाउन उल्लंघन व कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. वडिलांच्या मृत्यूंनंतर आयोजित तेरावीत परवानगीपेक्षा जास्त लोक जमले असा त्यांच्यावर आरोप आहे. यासह, मुंबईहून प्रयागराजकडे गाडी घेऊन गेलेल्या चालकाच्या संपर्कात आलेल्या कौंधियारा पोलीस ठाण्याला खबरदारी म्हणून क्वारंटाइन करण्यात आले आहे. शंकरगढमधील कापरी या गावातल्या तीन किलोमीटर क्षेत्र प्रशासनाने पूर्णपणे सील केले आणि त्यास हॉटस्पॉटमध्ये रूपांतरित केले. एसएसपी सत्यार्थ अनिरुद्ध पंकज यांनी सांगितले की, 3 मे पर्यंत येथील लॉकडाऊन कडक ठेवण्यात आले आहे आणि त्यामध्ये कोणतीही शिथिलता देण्यात आलेली नाही. संबंधित -24 तासांत 19 रुग्णांचा मृत्यू; मुंबई-पुण्यानंतर ग्रामीण भागातही पसरतोय कोरोना GOOD NEWS : देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण झाले दुप्पट
First published:

Tags: Corona virus in india

पुढील बातम्या